विघ्नहर्ता योगनृत्य परीवारासह ‘योगवंदन’
नागपूर : विघ्नहर्ता योगनृत्य परीवाराच्यावतीने जागतिक योगदिनाचे निमित्त साधून सक्करदरा येथील जगतगुरू संत तुकाराम महाराज उद्यानात ‘योगवंदन’ कार्यक्रम घेण्यात आला. योगनृत्य परीवाराचे मुख्य प्रशिक्षक डॉ. बबनराव गांजरे, सहायक प्रशिक्षक महादेवराव तोंडरे आणि अरुण राऊत यांनी वेगवेगळी योगासनाची प्रात्याक्षिक सादर केले.
विघ्नहर्ता योगनृत्य परीवाराच्यावतीने दत्तात्रयनगर उद्यान आणि जगतगुरू संत तुकाराम महाराज उद्यानात गेल्या ८ ते १० वर्षांपासून योगनृत्याचे धडे देण्यात येतात. जवळपास ४०० पेक्षा जास्त योगनृत्याचे प्रशिक्षणार्थी येथे धडे घेत असतात. मुख्य प्रशिक्षक डॉ. बबनराव गांजरे यांच्या मार्गदर्शनात उद्यानात विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यात उद्यानाची स्वच्छता अभियान, वृक्षारोपन, वृृक्षसंवर्धन यासह सर्वच धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येतात. योगदिनाचे निमित्त साधून सक्करदरा येथील जगतगुरू संत तुकाराम महाराज उद्यानात योगवंदन उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनीही विविध योगसने करून प्रात्याक्षिक करून दाखविण्यात आली.
या कार्यक्रमाला सुनीता चापके, स्वाती गांजरे, मंदा नखाते जान्हवी पाटील, सुनीता ढोबळे, रेखा देशमुख, स्मिता होले, रक्षा घुले, प्रियंका दुधाळकर, काजोल जयस्वाल, अर्चना सोनी, जान्हवी पाटील, पिंकी वर्मा, अंजली राऊत, भाग्यश्री परकाळे, सोनाली ठाकरे, अरुणा तितरे, अपर्णा गुरालवार, माधुरी कावड़े, संगीता कोंगे, कविता शिंगारे, संध्या बालपांडे, अर्चना अंगतवार, शालीनी घोरडकर, कविता नाईक, उज्वला कोठाळे, पुष्पा भोयर, रुपाली बाळबुधे, राधा गारघाटे, ममता बैस्वार, जयश्री पडोळे, वैशाली बहाड, ललिता येवले, तृप्ति घोगरे, स्वाती अरमरकर, शालिनी पडवे, विनोद लुटे, देवेंद्र बागल, शशिकांत मामीडवार, आशिष सिरसाट, दीपक तऱ्हेकर, अनिल कांबळे, अनिल खापरे, दिनेश खुरसडे, अरुण बुरडकर, संजय तलवारे, कुलदीप घोडके, गौतम वानखेडे, अनिल खुटाफळे, अतूल मैदळकर, नत्थुजी ढोबळे, दिलीप देशमुख, दिलीप भैस्वारे, विनायक होले, विनोद मेश्राम, प्रभाकर टिक्कस, हिम्मतराव आगाशे, लक्ष्मण बालपांडे, राजू कोठाळे, विनोद साउरकर, प्रकाश वाघमारे, राजेन्द्र लोखंडे, राजेश धोटे हे उपस्थित होते.