धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्य अधिवेशन अभियंता भवन अमरावतीला संपन्न
अमरावती : धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य चे तृतीय वार्षिक अधिवेशन रविवार दिनांक 7 जुलै 2024 रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात संपन्न झाले. अमरावती येथे अधिवेशनला सभा अध्यक्ष म्हणून मा. श्री अनिलकुमार ढोले संविधान अभ्यासक राज्याध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री जयंत बोबडे मुख्य अभियंता (से नि) महानिर्मिती, श्री नारायण माने अवर सचिव गृह विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री अतुल सोनजे उपमुख्य अभियंता महानिर्मिती मुंबई, श्री रवींद्र जोगी उपजिल्हाधिकारी बुलढाणा, श्री अनिल पुनसे उपमुख्य अभियंता सी टी पी एस चंद्रपूर, श्री हरेश सूळ उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लघुसिंचन अमरावती, श्री प्रफुल औघड अधीक्षक अभियंता महापारेषण अकोला उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री अमोल नरोटे वैद्यकीय अधीक्षक विभागीय सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल अमरावती, श्री संतोष सातपुते कार्यकारी अभियंता महापारेषण मुंबई, डॉ. निलेश खटके अधीक्षक व तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती, सौ निता प्रफुल औघड सहा. आयुक्त जिल्हा कौशल्य विकास कार्यालय वर्धा, डॉ. सुनीता प्रशांत तिडके प्राध्यापक दालमिया कॉलेज मुंबई, शेखर पुनसे तहसीलदार परतवाडा, प्रदीप कोल्हे साहेब उपस्थित राहणार होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष श्री प्रवीण रामदास लांडे जिल्हाध्यक्ष अमरावती हे होते.
मंचकावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल पुष्पगुच्छ, व रोपटे देऊन करण्यात आले. मान्यवरांची आपल्या भाषणातून समाजाला संबोधित केले, अनिलकुमार ढोले यांनी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची प्रश्न सोडविण्यासाठी कडीबद्द आहेतच , तसेच समाजातील विद्यार्थी, समाजासाठी काम करत असतो.
कार्यक्रमामध्ये दहावी, बारावीच्या 85% च्या वर गुण प्राप्त झाले त्या विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्पगुच्छ, शिल्ड, स्मरणिका देऊन करण्यात आला, तसेच सेवानिवृत्त कर्मचारी आणि नवनियुक्त कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ, शिल्ड, स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला.
राज्य अधिवेशन हे चार सत्रात संपन्न झाले. अधिवेशनात पाच विषयावर पदोन्नती मधील आरक्षण, झाडे,झाडया जातीचे अतिक्रमण, महिला कर्मचारी यांचा संघटनेत सहभाग, अधिसख्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न, एस टी आरक्षण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र राज्य च्या विविध जिल्ह्यातील आलेले जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अमरावती येथे अधिवेशनाला महाराष्ट्र राज्यातील जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी व सदस्य आणि समाजातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य चे तृतीय वार्षिक अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अमरावती जिल्हा कार्यकारणी, सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य यांनी प्रयत्न केले.