नागपूर : ऑटोमोबाईल उद्योगात सक्रिय पावले उचलण्याच्या प्रयत्नासह 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रगतीशील प्रवास सुरू ठेवत, M/s.ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड (AMPL) ला “ऑटोमोटिव्ह रिन्यू” – एक नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा (RVSF) नागपूर, महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या प्रतिष्ठित परवान्याने सज्ज, कामठी रोड येथे सुरू करण्याचा अभिमान वाटतो.
ऑटोमोबाईल उद्योगातील विकास लक्षात घेऊन आणि वाहन प्रदूषण हा देशासाठी एक गंभीर धोका आहे हे लक्षात घेऊन, सर्व आधुनिक साधने, उपकरणे, प्रशिक्षित आणि समर्पित व्यावसायिकांच्या टिमसह अत्याधुनिक RVSF “ऑटोमोटिव्ह रिन्यू” चे उद्घाटन श्री विवेक भीमनवार, IAS, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम सर्व एंड ऑफ लाइफ वाहनांची (ELV) नोंदणी रद्द करणे आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्क्रॅप करणे सुनिश्चित करेल.
ऑटो क्षेत्रातील प्रणेते श्री भरत सांघवी, अध्यक्ष, एएमपीएल, यांनी ऑटोमोटिव्ह चा पहिला RVSF हा प्रकल्प नागपुरात सुरू करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला आहे.
उद्घाटन समारंभात, श्री विवेक भीमनवार यांनी ऑटोमोटिव्ह उद्योगातील शाश्वत पद्धतींचे महत्त्व आणि देशाची पर्यावरणीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी RVSF च्या भूमिकेवर भर दिला. “उद्याच्या स्वच्छ पर्यावरणासाठी ऑटोमोटिव्हने उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल अभिमानास्पद आहे.” अशा उपक्रमांवर प्रकाश टाकून त्यांनी समारोप केला.
श्री सचिन सांघवी, कार्यकारी संचालक, एएमपीएल, एक तांत्रिकदृष्ट्या पात्र व्यावसायिक, आपल्या स्व मार्गदर्शनाने आणि अनुभवी व्यावसायिकांच्या टिमसह हा प्रकल्प समर्थपणे पुढे नेत आहेत.
श्री. सचिन सांघवी प्रदूषणमुक्त भविष्यासाठी ठामपणे समर्थन करतात आणि एका जबाबदार व्यावसायिक घराण्याचे नेते म्हणून त्यांनी सरकारच्या या “पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन” (ESG) उपक्रमाचा उत्कटतेने स्वीकार केला आहे. “ऑटोमोटिव्ह रिन्यू” हे ELV चे विघटन वैज्ञानिक आणि पद्धतशीरपणे केले जाते याची खात्री करण्यासाठी, प्रदूषणमुक्त करण्याच्या सर्व वैधानिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आणि आंतरराष्ट्रीय मानके आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार ELV मधील जास्तीत जास्त सामग्रीचा पुनर्वापर करण्यायोग्य सुनिश्चित करण्यासाठी तयार केले आहे.
यासारखे आणखी उपक्रम केवळ प्रदूषणमुक्त भविष्याची दृष्टी प्राप्त करण्यास मदत करतील असे नाही, तर विविध आवश्यक उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणात संघटित कच्चा माल प्रदान करून अर्थव्यवस्थेला हातभार लावतील. आर्थिक बाजूने हे केवळ भंगाराच्या आयातीमुळे राजकोषीय तूट कमी करण्यास मदत करेल असे नाही, तर स्वदेशी मोहिमेलाही (मेक इन इंडिया अभियान) मजबूत चालना देईल. एक संधी दिल्यास “ऑटोमोटिव्ह रिन्यू” नजीकच्या भविष्यात असे आणखीन RVSF सारखे प्रकल्प तयार करण्यास पुढाकार घेईल.
प्रकल्पाची नियोजित क्षमता प्रतिवर्ष २५००० वाहने आहे. यामध्ये दुचाकी ते उच्च क्षमतेच्या ट्रॅक्टर ट्रेलरपर्यंत सर्व मोटारगाड्यांचा समावेश असेल.