रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाची विशेष चमू गठीत
हॉट मिक्स प्लाँट विभागाचा पुढाकार
नागपूर : नागपूर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या हॉट मिक्स प्लाँट विभागाद्वारे विशेष चमू गठीत करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात सुसूत्रता यावी व वेळेत खड्डे बुजविले जावेत याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विभागाला निर्देश दिले होते. हॉट मिक्स प्लाँट विभागाद्वारे आता प्रत्येक झोन स्तरावर समन्वयक नेमून त्यांची जबाबदारी निश्चित केली आहे.
हॉट मिक्स प्लाँट विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अजय डहाके यांनी सांगितले की, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाद्वारे विशेष पाच चमु गठीत करून साप्ताहिक वेळापत्रकानुसार झोननिहाय खड्डे बुजविण्याचे कार्य केले जात आहे. याकरिता प्रत्येक झोनमध्ये उपअभियंता यांना समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २३ ते २५ जुलै २०२४ या कालावधीमध्ये मंगळवारी, धंतोली, गांधीबाग, आशीनगर आणि लकडगंज या पाच झोनमधील खड्डे बुजविण्यात येत आहेत. तर २६, २७ आणि २९ जुलै २०२४ या कालावधीत धरमपेठ, सतरंजीपुरा, नेहरूनगर, लक्ष्मीनगर आणि हनुमान नगर झोनमधील खड्डे बुजविण्याबाबत कार्य केले जाणार आहे.
झोननिहाय समन्वयक
हॉट मिक्स प्लाँट विभागाद्वारे झोननिहाय समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. लक्ष्मीनगर झोनकरिता उपअभियंता श्री. नेताम, धरमपेठ झोनकरिता उपअभियंता श्री. मोकडे, हनुमाननगर झोनकरिता उपअभियंता श्री. आगरकर, धंतोली झोनकरिता प्र- उपअभियंता श्री. तालेवार, नेहरूनगर झोनकरिता उपअभियंता श्री. निखार, गांधीबाग झोनकरिता उपअभियंता श्री. कोटांगळे, सतरांजीपुरा झोनकरिता उपअभियंता श्री. बोबडे, लकडगंज झोनकरिता उपअभियंता श्री. भोवते, आशीनगर झोनकरिता उपअभियंता श्री. गजभिये, मंगळवारी झोनकरिता उपअभियंता श्री. सोनकुसरे यांनी नेमणूक करण्यात आली आहे.