विदर्भात विकासाची बरीच कामे
झालीत, आणखी होतील- मधुरेंद्र सिन्हा
नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळात आाणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही विदर्भ हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा प्रदेश उपेक्षितच राहिला आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे 2014 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी विदर्भाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार केला. 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावले आणि विदर्भाची भूमी सुजलाम सुफलाम केली. कृषी आणि आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने त्याच्या परिणामी विदर्भाच्या विकासाला गती मिळाली. अनेक मोठे प्रकल्प पूर्ण झाले आणि त्याचा लाभ विदर्भासह संपूर्ण राज्याला झाला. विदर्भाला एक नवी ऊर्जा प्राप्त झाली.
नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी कमी वेळ लागावा आणि प्रवास सुखकर व्हावा यादृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेप्रवास गतिमान करण्यास प्राधान्य दिले. रस्त्याने प्रवास केल्यास नागपूर-मुंबई अंतर हे 816 किलोमीटर आहे. ते अंतर कमी वेळात कापता यावे यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला. हा महामार्ग त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हे अंतर 7-8 तासांत पूर्ण करता येणार आहे. येणेजाणे सुकर झाल्याने सामान्य नागरिकांना, विशेषत: व्यावसायिकांना त्यांचा माल इकडून तिकडे आणि तिकडून इकडे आणणे अतिशय सोपे झाले आहे. प्रगतीच्या दिशेने टाकले गेलेले हे मोठे पाऊल आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर भाषा आणि प्रांताच्या आधारे राज्य पुनर्गठनाची मागणी जोर धरू लागली होती.
प्रदेशाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आंदोलनंही झाली. याच क्रमाने मुंबई राज्य, विदर्भ आणि मराठवाडा हे भाग एकत्र करून 1953 च्या नागपूर कराराअंतर्गत मराठी भाषिक राज्याची निर्मिती करण्यात आली. नव्या राज्याची राजधानी म्हणून मुंबई शहराची निवड झाली. पण, राजधानीचे हे शहर नागपूर-विदर्भापासून दूर आहे. त्यामुळे राजकीय नेते, अधिकारी आणि मंत्र्यांनी या भागाकडे लक्ष द्यावे असे ठरले. त्यातूनच महाराष्ट्र विधानसभेचे एक अधिवेशन नागपूरला घ्यावे असे करारात नमूद करण्यात आले.
हे अधिवेशन किमान सहा आठवडे चालावे असेही ठरवण्यात आले. प्रारंभीच्या काळात तर या बाबीचे पाालन करण्यात आले. मात्र, नंतर कालावधी कमी कमी होत गेला. त्यापेक्षाही वेगळी बाब अशी की अधिवेशन विदर्भात घेऊनही प्रत्यक्षात त्याचा लाभ होताना दिसत नव्हता. विदर्भाची उपेक्षा होतच राहिली आणि नाममात्र विकास झाला. त्यामागे कारणही होते. पश्चिम महाराष्ट्रातून येणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार आणि मंत्री यांचे लक्ष विदर्भाच्या विकासाकडे न राहता पश्चिम महाराष्ट्राकडेच जास्त राहिले. याचा परिणाम असा झाला की विदर्भ प्रदेश मागासच राहात गेला. उद्योग-व्यवसाय तर वाढलेच नाहीत, कृषी क्षेत्रालाही चालना मिळाली नाही. शेतकर्यांचा त्रास कमी न होता वाढतच गेला. आर्थिकदृष्ट्या शेतकरी पिछाडीवर जात राहिले आणि दारिद्र्यात ढकलले गेले.
कापसाचे भरपूर ÷उत्पादन घेणार्या विदर्भाला पांढर्या सोन्याची भूभी म्हणून ओळख प्राप्त झाली असताना उत्पादन परवडेनासे झाल्याने आत्महत्या वाढल्या आणि विदर्भ प्रदेश शेतकरी आत्महत्यांसाठी कुख्यात झाला. 2014 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम याच बाबीवर लक्ष केंद्रीत करून आत्महत्या कशा थांबतील यासाठी प्रयत्न सुरू केले. सरकारनेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याने पहिल्यांदाच विदर्भात कृषी आणि आर्थिक क्षेत्राचा विकास सुरू झाला.
विदर्भातील शेतकरी अनेक समस्यांनी घेरला गेला असल्याचे फाडणवीसांच्या लक्षात आले. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी 35 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना कार्यान्वित केली. याचा शेतकर्यांना चांगला फायदा झाला. शेतकर्यांना पुन्हा कर्ज मिळू लागले. याशिवायही अनेक योजनांवर काम सुरू झाले आणि त्याच्या परिणामी विकास होताना स्पष्टपणे दिसू लागला.
अनेक दशके उपेक्षित राहिलेल्या विदर्भाचा विकास वेगाने सुरू झाला असतानाच राज्यात सरकार बदलले. 2029 साली पुुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षाच्या मदतीने सत्तेत आले. शिवसेनेनेच यात महत्त्वाची भूमिका बजावली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या सरकारमध्ये विदर्भाला प्राधान्य असल्याचे कुठे दिसले नाही. याचा परिणाम असा झाला की, विकासाची चाललेली कामेही ठप्प झाली आणि नव्याने कुठलीही कामे सुरू झाली नाहीत. प्रगती थांबल्यासारखीच झाली.
विदर्भाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे कोणताही मोठा नेता विदर्भात नव्हताच मुळी. काही काळ कळ सोसणार्या विदर्भाला पुन्हा दिलासा मिळाला. 2022 साली शिवसेनेत बंड झाले, एकनाथ शिंदे भाजपासोबत आले, त्यांनाच मुख्यमंत्री करण्यात आले आणि विदर्भाचे भाग्य बदलले. भाजपा पुन्हा सत्तेत आल्याने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विदर्भ विकासाला चालना दिली.
देवेंद्र फडणवीस यांना शिक्षणात फार रुची आहे. ते स्वत:ही उच्चशिक्षित आहेत. त्यांच्याकडे कायद्याची पदवी आहेच, त्यांनी व्यवस्थापन एमबीएसुद्धा केले आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयात त्यांनी जर्मनीतून डिप्लोमाही मिळवला आहे. त्यामुळेच नागपूरला त्यांनी शिक्षणाचे मोठे केंद्र बनविण्याचा निर्धार केला. यात त्यांना बर्यापैकी यशही मिळाले. विशेषत्वाने तयार करण्यात आलेल्या बुटीबोरी औद्योगिक कॉरिडॉरमध्ये त्यांच्या प्रयत्नाने टेक्सटाईल हबही उभारण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
योग्य दिशेने टाकली गेलेली ही पावलं होती. त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे जनतेकडूनही स्वागतच झाले. त्यांनी नागपूरला एअरपोर्ट तथा कार्गो हब बनविण्याचे काम सुरू केले. त्यांचे स्वप्न असलेला समृद्धी महामार्ग आता पूर्णत्वास येत आहे. मुंबईच्या अलितडचा शेवटचा टप्पा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि त्यामुळे नागपूरहून मुंबईला जाण्यास लागणारा वेळ कमी होईल अन विकासाला आणखी गती मिळेल, यात शंका नाही. या महामार्गामुळे 14 जिल्ह्यातील लोकांना फायदा होणार आहे. याशिवाय त्यांनी नागपूर शहरात मेट्रोची निर्मिती सुरू केली.
डिसेंबर 2022 मध्ये राज्य सरकारने 70 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना हिरवी झेंडी दिली, ज्यामुळे विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि पुणे शहरांच्या विकासाला चालना मिळेल. या गुंतवणुकीमुळे 50 हजार लोकांना रोजगार मिळण्याची आशा आहे. या मोठ्या गुंतवणुकीअंतर्गत नक्षलग्रस्त चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही तीन मोठे प्रकल्प आले आहेत. या प्रकल्पांमुळे विदर्भाच्या या मागास भागांच्या प्रगतीलाही चालना मिळणार आहे.
निऊडा क्लिटेंक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हरित तंत्रज्ञान आधारित कोल गॅसिफिकेशन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याचप्रमाणे लॉईड मेटल एनर्जी या कंपनीने गडचिरोली क्षेत्रातील मायनिंग, प्रोसेसिंग आणि स्टील प्लाण्ट लावण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विदर्भातील अमरावती भागात टेक्सटाईल्सला चालना देण्यासाठीही पावले उचलण्यात आली आहेत. इंडोरामा कंपनीच्या सहयोगी कंपन्यांच्या माध्यमातून टेक्सटाईल्स सेक्टरला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी 2240 कोटी रुपयांचे प्रकल्प चालविले जातील.
एकूणच काय, तर विदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक प्रकारे उपाय करण्यात येत आहेत. ज्या योजना मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्या पूर्ण होताच विदर्भाचा विकास पूर्ण होईल. गुंतवणुकीच्या मार्गानेच विकासाचा प्रवास होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना ही बाब फार लवकर लक्षात आली आहे. यावर त्यांनी गांभीर्याने विचार केला आहे. विदर्भाचा विकास करून देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची मनं जिंकली आहेत. बाकी, ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांनी ते जरूर करावे. त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा करणे व्यर्थच!