राजकीय नेत्याच्या मुलाची ‘ऑडी’ कार ‘नेमप्लेट’ पडली की काढली ?
रविवारच्या मध्यरात्री ‘ऑडी’ कारने केला अपघात
संकेत बावनकुळेचे सिताबर्डी पोलीस मंगळवारी बयान नोंदविणार !
नागपूर : रविवार (८ सप्टेंबर) च्या रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास एका बलाढ्य राजकीय नेत्याच्या मुलाच्या ‘ऑडी’ कारने वाहनांचा अपघात केला. सिताबर्डी पोलीसांनी ‘ऑडी’ कारसह दोघांना ताब्यात घेतले. मात्र सिताबर्डी पोलीस स्टेशन येथे उभी असलेल्या ‘ऑडी’ कारची नंबर प्लेटच नसल्याने उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. नंबर प्लेट राजकीय दबावात पोलीसांनी तर काढली नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे. संकेत बावनकुळेचे सिताबर्डी पोलीस मंगळवारी बयान नोंदविणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, उपराजधानी नागपुर शहरात रविवार (८ सप्टेंबर) च्या मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास इलेक्ट्रॉनिक ऑडी कार क्रमांक (एम. एच ४०-CY-४०४०) ने एका दुचाकी सह अनेक वाहनांना धडक दिली. भरधाव वेगाने ऑडी कार असल्याने धडक दिलेले वाहन चेंदामेंदा झाले. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार इलेक्ट्रॉनिक ‘ऑडी कार’ चा मालक संकेत चंद्रशेखर बावनकुळे आहे. रविवारच्या रात्री धरमपेठ येथील एका नामांकित बार मध्ये ‘ऑडी कार’ मध्ये सवार असलेल्या व्यक्तींनी बेधूंद मध्य प्राशन केले अशी माहिती समोर येत आहे.
त्यानंतर, रामदासपेठ, लोकमत चौक, संविधान चौक, मानकापूर मार्गाने भरधाव वेगाने कार चालविली. या चौकातूनही मार्गभ्रमण करताना अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती आहे. सिताबर्डी पोलीस याचा तपास सीसीटीव्हीच्या माध्यमातून करीत आहे. संकेत चंद्रशेखर बावनकुळेच ऑडी कार चालवित होता की नाही याचा शोध सिताबर्डी पोलीस घेत आहे. पोलीसांनी मात्र विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
विशेष सांगायचे म्हणजे, फिर्यादी जीतू शिवाजी सोनकांबळे रात्री पर्यंत पोलीस स्टेशन येथे आपल्या लहान भावासह हजर होता. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी कार्यालयातील कर्मचारीही ठाम मांडून बसला होता. फिर्यादी सोनकांबळे यांच्याशी बावनकुळेचा कर्मचारी चर्चा करीत होता, हे सत्य सिताबर्डी पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही मध्ये कैद आहे.
दुय्यम पोलीस निरीक्षक यांच्याकडे तपास असल्यामूळे त्यांच्या कक्षा समोरच उपरोक्त सर्वजन बातचित करीत होते. फिर्यादी जीतू सोनकांबळे यांच्याशी बातचित केली असता त्याने उडवा उडविचे उत्तर दिले. घटना गंभीर असताना फिर्यादीवर कुणाचा दबावतर नाहीना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विरोधकांनी या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. सिताबर्डीचे वरिष्ठ पोलीस अधिकारीही या प्रकरणात तपास चुकीचा करीत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. संकेत चंद्रशेखर बावनकुळे काय बयान देतो, याकडे आता संपूर्ण जनतेच लक्ष लागले आहे.