पाच पिडित तरुणींची केली सुटका
नागपूर : पोलीस स्टेशन धंतोली हद्दीतील मेहाडिया चौक येथील टू रिलॅक्स फॅमिली सलून ॲन्ड स्पा येथे देह व्यवसाय सर्रास सुरु होता. यावर गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारुन ५ पिडित मुलिंची सुटका केली आहे.प्राप्त माहिती नुसार, व्हेटरनरी कॉलेज, मानवसेवा नगर रहिवाशी प्रेमलता उर्फ डॉली सुभाष चिंचुलकर वय ३८ वर्ष गेल्या अनेक दिवसांपासून मेहाडिया चौकातील टू रिलॅक्स फॅमिली सलून ॲन्ड स्पा येथे देह व्यवसाय चालवित असल्याची माहिती नागपूर पोलीसांना होती. फंटर पाठऊन पोलीसांनी सापळा रचला व टू रिलॅक्स फॅमिली सलून ॲन्ड स्पा वरती छापा टाकला.
पोलीसांनी पाच तरुणींसह कंडोमचे पॅकेट घटनास्थळा वरुन जप्ती केले. १८ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल नागपूर पोलीसांनी जप्त केला. पुढील तपास धंतोली पोलीस करीत आहेत.