नितिन गडकरी यांच्या हस्ते जना स्मॉल फायनान्स बँकेच्या नव्या शाखेचे उद्घाटन
नागपूरमधील शाखेच्या उद्घाटनानंतर बँकेच्या शाखांची संख्या ७७६ वर, बँकिंग सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध !
नागपूर : जना स्मॉल फायनान्स बँक, या भारतातील सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने नागपूर, महाराष्ट्र येथे नवी शाखा सुरू केलीआहे. या शाखेच्या उद्घाटनाने जना स्मॉल फायनान्स बँकेच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा पार करत बँकेच्या शाखांची संख्या ७७६ झाली आहे.
महाराष्ट्र राज्य शाखांच्या नेटवर्कमध्ये चौथ्या क्रमांकावर असून शाखांची संख्या ८४ आहे. नवी शाखा बँकेच्या विस्तार योजनेचा भाग असून त्याद्वारे कंपनीने आपल्या सेवा देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नागपूर, महाराष्ट्रातील नवी शाखा विविध प्रकारच्या बँकिंग सेवा आणि उत्पादने पुरवणार असून त्यात बचत खाती, निश्चित ठेवी, कर्ज आणि विम्याचा समावेश आहे. शाखेद्वारे डिजिटल बँकिंग सेवाही दिल्या जाणार असून त्यात बँकिंग व इंटरनेट बँकिंग सेवांचाही समावेश असेल.
नागपूर शाखेच्या उद्घाटनानंतर जना स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखांची संख्या ७७६ वर गेली असून महाराष्ट्र ८४ शाखांच्या नेटवर्कसह चौथ्या क्रमांकावर आहे. १२ सप्टेंबर रोजी माननीय श्री. नितिन जी गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
माननीय श्री विनायक महामुनी, आईएएस, मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपुर जिला परिषद ,माननीय श्री कृष्णा पी खोपडे, आमदार, श्री. चंद्रशेखर गलगलीकर, आर्ट ऑफ लिव्हिंग श्री. रवी कासखेड़िकर, श्री दयाशंकर चंद्रशेखर तिवारी, पूर्व मेयर नागपुर, आणि श्री अजय बोधारे, पूर्व सभापति, पंचायत समिति, कांपटी हे मान्यवर उद्घाटनप्रसंगी नागपूर, महाराष्ट्र येथे उपस्थित होते. जना स्मॉल फायनान्स बँकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय कंवल म्हणाले, ‘माननीय श्री नितिन जी गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटनाने आम्ही भारावून गेलो आहोत.
माझ्यासाठी तसेच देशपातळीवरील आमच्या २२,००० कर्मचाऱ्यांसाठी हे प्रेरणादायी आहे. या लाँचमुळे महाराष्ट्रासारख्या आमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या राज्यातील बँकेचे अस्तित्व आणखी मजबूत झाले आहे. ही शाखा व तेथील फिजिटल सेवांच्या माध्यमातून नव्या भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. जना स्मॉल फायनान्स बँकेच्या २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत ७७६ शाखा आहेत. त्यापैकी २६१ शाखा म्हणजेच ३३.६ टक्के व्यवसाय अनबँक्ड रूरल केंद्र (युबीआर) आहेत.