सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

वोक्हार्ट हॉस्पिटल्सने पेशंट सेफ्टी वीक 2024 साजरा केला

वोक्हार्ट हॉस्पिटल्सने पेशंट सेफ्टी वीक 2024 साजरा केला

मुंबई- भारतातील तृतीयक केयर सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल्सची एक नामांकित शृंखला, वोक्हार्ट हॉस्पिटल्स लिमिटेडने, जागतिक पेशंट सेफ्टी दिनाच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने पेशंट सेफ्टी वीक 2024 साजरा केला. या वर्षीची थीम, “इम्प्रूविंग डायग्नोसिस फॉर पेशंट सेफ्टी,” ही रुग्णाची सुरक्षितता आणि आरोग्य सेवा परिणाम वाढविण्यासाठी अचूक आणि वेळेवर निदान करण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकते.

“गेट इट राइट, मेक इट सेफ” या घोषवाक्यासह हॉस्पिटल अचूक निदानतेचे महत्त्व अधिक बळकट करण्यावर आणि सर्व विभाग आणि युनिट्समधील सुरक्षितता सुधारण्याच्या सामूहिक प्रयत्नात रुग्ण, कुटुंबे आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांना सहभागी करून घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) चालवलेल्या जागतिक पेशंट सेफ्टी मोहिम अंतर्गत, वोक्हार्ट हॉस्पिटल्समधील या आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमात कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना सहभागी करून घेण्यासाठी इंटरएक्टिव्ह सेफ्टी क्विझपासून पोस्टर स्पर्धा आणि सेफ्टी पॅव्हेलियनपर्यंत शैक्षणिक उपक्रम आणि स्पर्धांचा समावेश असेल. रूग्णांच्या सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन निर्माण करण्याचे हॉस्पिटलचे उद्दिष्ट आहे.

पेशंट सेफ्टी वीक 2024 साठी प्रमुख उपक्रम

इंटरनॅशनल पेशंट सेफ्टी गोल्स (आयपीएसजी) वर वर्कस्टेशन्स

” इम्प्रूविंग डायग्नोसिस फॉर पेशंट सेफ्टी ” या थीम वर लक्ष केंद्रित करणारी पोस्टर स्पर्धा

रुग्णांना आणि कुटुंबांना सुरक्षिततेच्या जागरूकतेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी रुग्ण आणि कौटुंबिक प्रश्नमंजुषा

सहयोगी आणि सल्लागारांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा

युनिट आणि ग्रुप- लेव्हल बक्षिसे असलेल्या सल्लागारांद्वारे 60-सेकंद व्हिडिओंसाठी पेशंट सेफ्टी रील्स

घोषवाक्य स्पर्धा आणि सुरक्षिततेच्या कल्पना

क्लिनिकल आणि नॉन-क्लिनिकल अशा दोन्ही रुग्णांच्या सुरक्षा अधिका-यांचा सक्रिय सहभाग

क्रिटिकल टेस्टच्या निकालाबाबत जागरूकता या विषयावर शिक्षण

तसेच रुग्णांना अचूक निदान आणि सुरक्षा प्रक्रियांचे महत्त्व याविषयी शिक्षित करण्यासाठी लॅब, इमेजिंग आणि आंतररुग्ण क्षेत्राच्या सहकार्याने सेफ्टी पॅव्हेलियन उभारले जातील. ही इंटरएक्टिव्ह सेशन रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मौल्यवान माहिती पुरवतील, ज्यामुळे सुरक्षित आणि प्रभावी उपचार देण्याच्या वोक्हार्ट हॉस्पिटलची बांधिलकी आणखी मजबूत होईल.

सुश्री जहाबिया खोराकीवाला, मॅनेजिंग डायरेक्टर, वोक्हार्ट हॉस्पिटल्स ग्रुप यांनी लॉन्च प्रसंगी सांगितले की, आम्ही रुग्णांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि त्यांना दर्जेदार उपचार देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पेशंट सेफ्टी वीक 2024 दरम्यान, आम्ही सुरक्षिततेची संस्कृती निर्माण करण्याच्या आमच्या समर्पणाची पुष्टी करतो जिथे प्रत्येक रुग्णाला उच्च दर्जाचे उपचार मिळते.”

 

डॉ. क्लाइव्ह फर्नांडिस, ग्रुप क्लिनिकल डायरेक्टर आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, वोक्हार्ट हॉस्पिटल्स ग्रुप, म्हणाले: “रुग्णांची सुरक्षितता हा एक चालू असलेला उपक्रम आहे, आणि उपचारात सुधारणा करणे हे रूग्णांचे आरोग्य सुधारण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमाद्वारे, सुरक्षित आरोग्य सेवा वातावरणास प्रोत्साहन देण्यासाठी सहयोगी, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना सहभागी करून घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

डॉ. पराग रिंदानी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, वोक्हार्ट हॉस्पिटल्स ग्रुप यांनी आपले विचार मांडले: “वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये, आम्ही रुग्णाच्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य देतो. पेशंट सेफ्टी वीक 2024 उच्च-गुणवत्तेची काळजी प्रदान करण्यात अचूक निदानाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतो. हा उपक्रम उत्कृष्टता आणि रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवेसाठी आमची बांधिलकी अधिक मजबूत करतो.”

वोक्हार्ट हॉस्पिटल बद्दल:

वोक्हार्ट हॉस्पिटल्स ही नागपूर, राजकोट, दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबई येथील सुविधांसह तृतीयक केयर सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल्सची शृंखला आहे. सर्व वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये रुग्णांच्या काळजी आणि सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावर बेंचमार्क प्रक्रिया आहेत.

वोक्हार्ट हॉस्पिटल्स लिमिटेड हे देशातील काही व्यावसायिकरित्या व्यवस्थापित कॉर्पोरेट हॉस्पिटल ग्रुपपैकी एक आहे जे रुग्णांच्या सुरक्षिततेला आणि उपचारांच्या गुणवत्तेला प्राधान्य देते. हॉस्पिटल्समध्ये एकूण 1500 बेड आणि क्लिनिकल आणि नॉन-क्लिनिकल अशा दोन्ही प्रक्रियांसाठी 1000 हून अधिक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया किंवा प्रोटोकॉल आहेत. रुग्णांची सेवा करणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे हॉस्पिटलचे मार्गदर्शक तत्वज्ञान आहे.

- Advertisment -