माजी मंत्री दत्तात्रय राणे यांना विधानसभेत श्रद्धांजली
नागपूर : विधानसभेचे माजी सदस्य व माजी मंत्री दत्तात्रय महादेव राणे यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
दिवंगत माजी सदस्य दत्तात्रय राणे यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला.
0000000000
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर
नागपूर : विधानसभा कामकाजासाठी तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात जाहीर केली.
विधानसभा तालिका सभाध्यक्षपदी सदस्य सर्वश्री विजय रहांगडाले, रमेश बोरनारे, शेखर निकम, दिलीप सोपल यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी जाहीर केले.