खासदार सांस्कृतिक महोत्सवाला लागले गालबोट !
नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सव येथे येणाऱ्या श्रोत्यांच्या वाहनांच्या पार्किंग व्यवस्था असलेल्या जागी एका चार चाकी वाहनाला भिषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे. कुठली हि जिवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
बुधवार (१८ डिसेंबर) रोजी खासदार सांस्कृतिक महोत्सवात अभिजात मराठी भाषेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला श्रोत्यांची तुफान गर्दी होती. कार्यक्रम स्थळाच्या बाहेर आयोजक मंडळा तर्फे पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे. आज अचानक पार्किंग मध्ये एका चारचाकी वाहनाला अचानक कडाक्याच्या थंडी दरम्यान आग लागल्याने पोलीसांची व श्रोत्यांची तारांबळ उडाली. १३ ते २२ डिसेंबर पर्यंत खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेत जिवित हानी झाली नाही. मात्र चारचाकी वाहन जळाले. वाहनाला कश्यामूळे आग लागली याचा तपास नागपूर पोलीस करीत आहे.