सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सने नागपुरातील पहिल्या स्टोअरसह महाराष्ट्रातील अस्तित्व केले वृद्धिंगत

सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सने नागपुरातील पहिल्या स्टोअरसह महाराष्ट्रातील अस्तित्व केले वृद्धिंगत

भारतातील १७५ वे तर महाराष्ट्रातील पहिले फ्रँचाईझी स्टोअर 

नागपूर, : सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्स या भारतातील एका सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक विश्वासार्ह ज्युलरी रिटेल चेनतर्फे अत्यंत अभिमानाने नागपुरातील त्यांच्या पहिल्या स्टोअरच्या अनावरणाची घोषणा करण्यात आली आहे. हे नवे स्टोअर या ब्रँडचे महाराष्ट्रातील आठवे तर भारतातील १७५ वे स्टोअर असल्याने हा उद्घाटनसोहळा म्हणजे महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. विशेष म्हणजे हे सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सचे राज्यातील पहिले फ्रँचाईझी स्टोअर आहे.

४,३५० चौ. फुट अशा भव्य जागेतील हे नवे शोरूम म्हणजे अप्रतिम कलाकुसर असलेल्या दागिन्यांच्या अतुलनीय कलेक्शनचे आणि खास कारागिरीच्या ब्रँडच्या वारशाचे प्रतिक आहे. नागपूरमध्ये लक्ष्मी नगरमधील अंबाझरी रोडवर मोक्याच्या ठिकाणी असलेले हे स्टोअर म्हणजे या भागातील आणि आसपासच्या ग्राहकांना सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या उत्पादनांची व्यापक श्रेणी सादर करण्याच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे.

इव्हरलाइट कलेक्शनमधील समकालीन हलक्या वजनाचे दागिने तसेच शगून आणि गठबंधन कलेक्शनमधील क्लासिक लग्नाचे दागिने अशा बहूविध पर्यायांचे व्यापक कलेक्शन या स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक प्रसंगासाठी सुयोग्य अशा पारंपरिक कलाकुसर आणि आधुनिक डिझाइचा मेळ असलेल्या या स्टोअरमध्ये ग्राहकांना खरेदीचा पर्सनलाइज्ड अनुभव घेता येईल.

या प्रसंगी सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या संचालक श्रीमती जोइता सेन म्हणाल्या, “समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि दागिन्यांवरील प्रेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्स सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे स्टोअर आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. दर्जेदार कारागिरी, विश्वास आणि ग्राहकांचा आनंद याबद्दलची बांधिलकी जपत आम्ही फ्रँचायझी भागीदारीद्वारे आमची उपस्थिती वाढवत आहोत.”

सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुवांकर सेन म्हणाले, “महाराष्ट्रात आमचे पहिले फ्रँचायझी-संचालित स्टोअर उघडणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. नागपूर ही एक वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे आणि या फ्रँचायझी भागीदारीद्वारे, आम्ही अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू इच्छितो आणि त्यांना विविध प्रकारचे सुंदर दागिने देऊ इच्छितो. आमच्या ग्राहकांना एक उत्तम खरेदी अनुभव देण्यासाठी आणि त्यांच्याशी दृढ, दीर्घकालीन संबंध निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

नागपुरातील सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्स स्टोअरचे फ्रँचायझी देवेश लालदला यांनी आपला उत्साह व्यक्त करताना म्हटले की, “सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या यशोगाथेचा भाग होण्यासाठी आणि या प्रसिद्ध ब्रँडला नागपूरमध्ये आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. शहरातील ग्राहकांना या ब्रँडच्या उत्कृष्ट दागिन्यांचे कलेक्शन आणि अतुलनीय सेवा देण्याची संधी आम्हाला या फ्रँचाईझी भागीदारीमुळे मिळाली आहे. त्यांच्या सर्व दागिन्यांच्या गरजांसाठी एक विश्वासार्ह ठिकाण बनण्यास आणि दृढ, दीर्घकालीन संबंध निर्माण करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

उल्लेखनीय वारसा आणि भारतभरातील भरभराटीच्या दुकानांच्या नेटवर्कसह, सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्स दागिन्यांच्या रिटेल क्षेत्रात नवे मापदंड स्थापित करत आहे, ग्राहकांना जीवनातील मौल्यवान क्षण साजरे करता येतील असा कालातीत खजिना देत आहे.

सेन्को गोल्ड लिमिटेड, लागू असलेल्या वैधानिक आणि नियामक आवश्यकता, आवश्यक मंजुरी, बाजार परिस्थिती आणि इतर बाबींच्या अधीन राहून, त्यांच्या इक्विटी शेअर्सची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर करण्याचा प्रस्ताव देत आहे आणि त्यांनी १५ एप्रिल २०२२ रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे १४ एप्रिल २०२२ (“DRHP”) चा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे. DRHP हा SEBI च्या वेबसाइट www.sebi.gov.in वर, स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच BSE आणि NSE च्या वेबसाइट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि BRLM च्या वेबसाइट म्हणजेच IIFL सिक्युरिटीज लिमिटेड, अँबिट प्रायव्हेट लिमिटेड आणि SBI कॅपिटल मार्केट्स लिमिटेडच्या वेबसाइट अनुक्रमे www.iiflcap.com, www.ambit.co आणि www.sbicaps.com वर उपलब्ध असेल. संभाव्य गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की इक्विटी शेअर्समधील गुंतवणुकीत उच्च प्रमाणात जोखीम असते आणि अशा जोखमीशी संबंधित तपशीलांसाठी, कृपया DRHP च्या पृष्ठ 30 वरील “जोखीम घटक” शीर्षक असलेला विभाग पहा. संभाव्य गुंतवणूकदारांनी कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी SEBI कडे दाखल केलेल्या DRHP वर अवलंबून राहू नये.

ऑफरमध्ये ऑफर केलेले इक्विटी शेअर्स यूएस सिक्युरिटीज अॅक्ट किंवा युनायटेड स्टेट्समधील कोणत्याही राज्य सिक्युरिटीज कायद्यांतर्गत नोंदणीकृत नाहीत आणि राहणार नाहीत, आणि नोंदणीकृत नसल्यास, यूएस सिक्युरिटीज अॅक्टच्या नोंदणी आवश्यकतांमधून सूट मिळाल्याशिवाय किंवा त्यांच्या अधीन नसलेल्या व्यवहारात आणि कोणत्याही लागू यूएस स्टेट सिक्युरिटीज कायद्यांनुसार, युनायटेड स्टेट्समध्ये ऑफर किंवा विक्री केली जाऊ शकत नाही. त्यानुसार, इक्विटी शेअर्स केवळ युनायटेड स्टेट्सच्या बाहेर ‘ऑफशोअर ट्रान्झॅक्शन्स’ मध्ये ऑफर आणि विक्री केले जात आहेत जसे की यूएस सिक्युरिटीज अॅक्ट अंतर्गत नियमन एस आणि अशा ऑफर आणि विक्री केलेल्या क्षेत्राधिकारांच्या लागू कायद्यांनुसार परिभाषित केले आहे. युनायटेड स्टेट्समध्ये इक्विटी शेअर्सची कोणतीही सार्वजनिक ऑफरिंग होणार नाही.

https://sencogoldanddiamonds.com/

- Advertisment -