भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ललित कला भवन येथे उन्हाळी शिबिर
नागपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या इंदोरा चॉक्स कॉलनी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ललित कला भवन येथे १ मे ते १६ मे पर्यंत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
१४ मे रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी होती. मुलांनी एका पेक्षा एक कलांचे सादरीकरण करुण श्रोत्यांना मंत्रमूग्ध केले. जानवी बेलेकर या लहान शाळकरी मुलीने इंग्रजी मध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
कामगार कल्याण केंद्राच्या कल्याण निरीक्षक कांचन वाणी यांच्या नेतृत्वात प्रा. प्रकाश सहारे यांनी या उन्हाळी शिबिराचे संचालन केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. प्रशांत जांभूळकर होते. पंढरा दिवसाच्या या उन्हाळी शिबिरात सुशांत खोब्रागडे, आयुष बागडे, यश ढवळे, अंकित लिमजे, सारांश नाईक, दिशा ब्रम्हे, मनिषा चंदनखेडे यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना विविध कलांचे प्रशिक्षण दिले.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात ‘अवतरली चंद्रा’ या नृत्याने झाली. जानवी बेलेकर, शनाया बेलेकर, मोर्वी लोणारे या मुलींनी सुंदर असे नृत्य या मराठी गितावर केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रकाश सहारे यांनी केले. यावेळी बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होते.