संविधान डिबेट्स वाचन, 33 तासात 37 अनुच्छेदाचे केले वाचन !
नागपूर : संविधान डिबेट्स वाचनाच्या ऐतिहासिक व अखंड उपक्रमाला आज 7 वाजता 33 तास झाले. या उपक्रमात विविध स्तरावरील स्त्री पुरुष अशा 38 व्यक्तींनी 37 अनुच्छेदाचे वाचन केले आहे.
यातील काही अनुच्छेद 2 पानाचे तर काही अनुच्छेद 50 पानावर आहेत. काल सकाळी नऊ वाजता इंजि अशोक शंभरकर यांनी वाचनाला सुरुवात केली. त्यानंतर उत्तम शेवडे यांनी आज पहाटे चार वाजता प्रथम अनुच्छेदाचे वाचन केले. दुपारी महाविद्यालयीन विद्यार्थीनी अश्विनी पाटील व सुरभी वाशिमकर यांनी इंग्रजी डिबेटचे वाचन केले.
आतापर्यंत एड अस्मिता तिडके, प्रदीप कराडे, टीके रंगारी, रेखा अनंत लोखंडे, माधवी जांभुळकर, माधुरी हुमणे, सिद्धार्थ पाटोळे, पुष्पा शेंडे, अलका वाघमारे, अश्विनी घरडे, मधुबाला नंदेश्वर, नवज्योतसिंग श्रा, संगीता शील, योगिता शेंडे, माया उके, ममता बोदेले, पुष्पा घोडके, ममता कराडे, वर्षा सहारे, कल्पेश मेश्राम, कुमुद चोखांद्रे, मीनाक्षी सहारे, प्रा नंदा भगत, राखी बोबडे, पुष्पा बौद्ध, अनिल मेश्राम, सतीश अलोणे, पंकज मेश्राम, रेवनदास लोखंडे, संदेश थूल, गौतम पाटील, प्रशांत मुनघाटे, वर्षा टेंभेकर, दिलीप तांदळे, हरीश कावरे, प्रमिला थोरात, संध्या मेश्राम आदींनी अनुच्छेद प्रक्रियेचे वाचन केले. यावेळी प्रामुख्याने बार्टीचे वाळके, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे जुरी (परीक्षक) मनीष पाटील व कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वामन सोमकुवर व कॉन्स्टिट्यूट असेंबली डिबेट्सचे मुख्य अनुवादक प्रा देविदास घोडेस्वार प्रामुख्याने उपस्थित होते.
डिबेट वाचनाचा उपक्रम रात्रंदिवस सुरू असून 26 तारखे च्या सायंकाळी 4 पर्यंत राहणार आहे. इच्छुकांसाठी डिबेट्सचे खंड उपलब्ध असून इच्छुकांनी वाचनात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक न्याय विभाग, बार्टी प्रशासन व दिशा ह्युमन वेल्फेअर सोसायटी च्या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी दि बुद्धिस्ट गोल्डन इरा वुमेन्स फाउंडेशन च्या छाया बेहेरे-खोब्रागडे व त्यांचे सहकारी प्रामुख्याने विशेष परिश्रम घेत आहेत.