सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

रमाईचा त्याग अनन्य साधारण, परंतु चुकीचा सांगितल्या जात आहे : मालती वराडे

रमाईचा त्याग अनन्य साधारण, परंतु चुकीचा सांगितल्या जात आहे : मालती वराडे

नागपूर : संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी मातोश्री रमाई आंबेडकर यांचा त्याग अनन्य साधारण असून त्या त्यागमूर्ती आहेत. परंतु अनेक लेखक त्यांच्या कार्याचा गुणगौरव करीत असताना चुकीच्या पद्धतीने अतिरेक करीत आहेत. रमाईंनी कधी गोवऱ्या थापल्या नाही तर परडच्या बीआयटी चाळीत असताना अगदी पहाटे अंधारात जाऊन सुकलेलं शेण (गोवऱ्या) त्या गोळा करायच्या. तसेच धारवाड येथील वस्तीगृहात मुलांना खायला अन्न नसल्याने त्यांनी आपल्या हातातील बांगड्या विकल्या असं सांगितल्या जाते. खरं तर त्यांनी स्वतः धान्यासाठी शंभर रुपये दिले होते आणि गरज पडल्यास माझ्या बांगड्या सुद्धा विका असे बोलल्या होत्या.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे संचालकांना शेतकऱ्याकडून धान्य गोळा करण्याची सवड न मिळाल्यामुळे हा प्रसंग आला होता, अशा प्रकारची ऐतिहासिक माहिती हे वस्तीगृह चालविणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी बळवंत वराडे यांच्या सुनबाई मालतीताई प्रभाकर वराडे यांनी सांगितले.

आज नागपुरातील विविध महिला संस्था व संघटनांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटर येथे त्यागमूर्ती रमाई यांच्या 90 व्या स्मृतीदिन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथून ग्रंथपाल म्हणून निवृत्त झालेल्या मालतीताई प्रभाकर वराडे व त्यांचे सुपुत्र प्रसिद्ध संगीतकार, गायक कुणाल प्रभाकर वराडे हे प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा देविदास घोडेस्वार यांनी नागपूरकरांच्या वतीने मालती ताईंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

याप्रसंगी ममता कराडे यांनी रमाईंच्या जीवनावर एकांकिका प्रस्तुत केली. मंचावर गौतमी खोब्रागडे, निर्मला वाघधरे, एड अस्मिता तिडके, तक्षशिला वाघधरे, डगावकर मॅडम, आर्या धम्मसूची, ममता रामटेके, वर्षा सहारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया बेहरे यांनी तर समारोप वामन सोमकुवर यांनी केला. बसपाच्या वतीने उत्तम शेवडे, गौतम पाटील यांनी मालतीताई वराडे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

- Advertisment -