Home ibmtv9 मंगलदीप नगरात श्री संत गजानन महाराजांच्या व आडकुजी महाराजांच्या पादुका दर्शन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंगलदीप नगरात श्री संत गजानन महाराजांच्या व आडकुजी महाराजांच्या पादुका दर्शन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
मंगलदीप नगरात श्री संत गजानन महाराजांच्या व आडकुजी महाराजांच्या पादुका दर्शन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंगलदीप नगरात श्री संत गजानन महाराजांच्या व आडकुजी महाराजांच्या पादुका दर्शन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड जिल्ह्यातील माजलगाव वरून शरद भाऊ भांडेकर यांची पादुका दर्शन सोहळ्यात प्रेमापोटी उपस्थिती:

नागपूर : (देवराव प्रधान) : मानेवाडा बेसा रोडवरील मंगलदीप नगर येथे १४ जून, शनिवारी ॲड. सौ. हेमा सुनील काटेकर व सुनिल काटेकर दादांच्या नवीन घराचा गृहप्रवेश निमित्ताने त्यांनी नवीन घरी श्री क्षेत्र वरखेड चे परमहंस संत सद्गुरु आडकोजी महाराजांच्या पादुका दर्शन सोहळा तसेच श्री क्षेत्र शेंगांवचे श्री संत गजानन महाराजांच्या पादुका दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून प्रचंड गर्दी केली होती.

अखिल भारतीय कासार समाज मंडळाचे तथा मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष श्री शरदभाऊ भांडेकर हे बीड जिल्ह्यातील असून माजलगाव वरून नागपूर करिता 900 किलोमीटर अंतर कापत पादुका दर्शनासाठी नागपुरात ते प्रेमापोटी उपस्थित राहिले.

वरुडचे माजी डेपोटी कलेक्टर वासुदेवराव बळीरामजी विरखरे (दादा) काचुर्णा, ता. वरुड, जिल्हा अमरावती येथील पादुकांचे आगमन काटेकर दादांच्या घरी झाल्यानंतर सर्व भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. अथर्व सुनील काटेकर यांनी सर्व भक्त गणांचे आभार मानले. पाचशेच्या वरून भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री च्या कृपेने अत्यंत आनंदात व अतिशय सुंदर पादुका दर्शनाचा कार्यक्रम आणि लवकुश नगरातील हरिपाठ भक्त मंडळाचे अध्यक्ष श्री.मा.चंद्रशेखर क्षेत्रपाल (दादा) यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व कार्यक्रम आनंदात व उत्साहात पार पडला. पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर क्षेत्रपाल दादा, सुरेश चौधरी, राजू गुजर, बिजवे दादा, श्याम गोमासे, विनोद फेद्देवार, विजय सोनुले, सुनिल काटेकर, निखिल भुते, मोहन वैरागडे, दीपक वाळके, रामटेके दादा, पांगुळ दादा, लांजेवार दादा, क्रिष्ण हरडे, कहाते दादा, शरद भांडेकर, वासुदेवराव विरखरे, चकोले दादा, देवराव प्रधान आणि प्रशांत इंगळे सह तसेच काटेकरताई, योगिताताई, स्मिताताई, प्रधानताई, पांगुळताई, या सर्वांची उपस्थिती होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here