
स्व. भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण रविवारी
नागपूर : गोरगरीब जनतेला अत्यंत माफक दरात वैद्यकीय तपासण्यांची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची विशेष उपस्थिती असेल. लष्करीबाग येथील कमाल चौक परिसरात रविवारी दुपारी १२.३० वाजता हा कार्यक्रम होईल.
यावेळी बेंगलुरू येथील महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी पुज्य भंते श्री. आनंद थेरा, नागपूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष श्री. राघवेंद्र स्वामी, महाराष्ट्राच्या माजी मंत्री अॅड. सुलेखाताई कुंभारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक श्री. राजेश लोया, विशाखापट्टणम येथील एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मा आणि भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष श्री. दयाशंकर तिवारी यांची प्रमुख उपस्थिती असेल. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला येत असलेल्या या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, एक्स-रे, सिटी स्कॅन, एमआरआय, डायलिसिस या सुविधा उपलब्ध असणार आहेत.