Home ibmtv9 रेल्वेच्या माध्यमातून दोन श्रद्धास्थळांना जोडणारा उपक्रम

रेल्वेच्या माध्यमातून दोन श्रद्धास्थळांना जोडणारा उपक्रम

0

रेल्वेच्या माध्यमातून दोन श्रद्धास्थळांना जोडणारा उपक्रम

साईनगर शिर्डी आणि तिरुपती दरम्यान १८ विशेष सेवा चालवण्यात येणार

NAGPUR: रेल्वेची भक्तांसाठी खास भेट साईनगर शिर्डी आणि तिरुपती दरम्यान १८ विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. या ट्रेनमुळे दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांमध्ये थेट जोडणी होणार असून, श्री साईबाबा आणि श्री वेंकटेश्वर स्वामींच्या दर्शनाची संधी निर्माण होणार आहे.

तपशील पुढीलप्रमाणे आहेत: –

साईनगर शिर्डी – तिरुपती साप्ताहिक विशेष ट्रेन (१८ सेवा)

ट्रेन क्र. 07638 साप्ताहिक विशेष दर सोमवारी ०४.०८.२०२५ ते २९.०९.२०२५ या कालावधीत १९.३५ वाजता साईनगर शिर्डी येथून प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी ०१.३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल. (एकूण ९ सेवा)

ट्रेन क्र. 07637 साप्ताहिक विशेष दर रविवारी ०३.०८.२०२५ ते २८.०९.२०२५ या कालावधीत ०४.०० वाजता तिरुपती येथून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी १०.४५ वाजता साईनगर शिर्डी येथे पोहोचेल. (एकूण ९ सेवा)

थांबे: कोपरगाव, मनमाड, नागरसोल, औरंगाबाद, जालना, सेलू, परभणी, गंगाखेळ, परळी वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, भाळकी, बीदर, झहीराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, नलगोंडा, मिर्यालगुडा, नाडीकुडे, पिडुगुरल्ला, सत्तेनपल्ले, तेनाली, चिराला, ओंगोल, गुडूर आणि रेणिगुंटा.

संरचना: २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ४ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

आरक्षण: गाडी क्रमांक 07638 या विशेष गाडीच्या आरक्षणाची सुविधा ०१.०८.२०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच [www.irctc.co.in] (http://www.irctc.co.in) या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असल्याप्रमाणे सामान्य शुल्क आकारून, अनारक्षित कोचसाठी यूटीएस प्रणालीद्वारे बुकिंग करता येईल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here