सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

पालकमंत्री बावनकुळे यांच्या नावाने पोलिसांना दमदाटी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

पालकमंत्री बावनकुळे यांच्या नावाने पोलिसांना दमदाटी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे बावनकुळेंचे आदेश

 पालकमंत्री कार्यालयाकडून तक्रारही दाखल

नागपूर : राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने पोलिसांना दमदाटी करणाऱ्या तीन इसमांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराची तातडीने गंभीर दखल घेत स्वतः पालकमंत्री बावनकुळे यांनी या आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

या घटनेबाबत पालकमंत्री बावनकुळे यांच्या कार्यालयाने रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, 3 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कामठी मार्गावरील ईडन ग्रीन्स लॉन येथे काही लोकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, याठिकाणी पोलिसांनी परवानगी देताना आखुन दिलेल्या अटी व शर्थीचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे पोलिस याठिकाणी कार्यवाहीसाठी गेले असता आरोपी वेदांत छाबरिया रा. नागपूर, रितेश चंद्रशेखर भदाडे, रा. वाडी, आकाश बनमाली सालम यांनी पोलिसांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने दमदाटी केली. या घटनेचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बावनकुळे यांच्या लक्षात हा प्रकार आला असता त्यांनी तातडीने पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी बोलून सबंधित इसमांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

तसेच या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री बावनकुळे यांच्या कार्यालयाने जुनी कामठी पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार देखील दाखल केली. त्यानुसार उपरोक्त तीन आरोपींविरुद्ध 293, 221, 223 सहकलम 33(A), (W), (¡¡¡), 1 31, 1 35 म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -