सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

मिडास हॉस्पिटल, नागपूर येथे अत्याधुनिक ट्रॉमा विभागाचे उद्घाटन

मिडास हॉस्पिटल, नागपूर येथे अत्याधुनिक ट्रॉमा विभागाचे उद्घाटन

नागपूर : वैद्यकीय क्षेत्र हे सतत बदलणारे, आव्हानात्मक आणि बौद्धिक दृष्ट्या क्लिष्ट आहे. प्रत्येक गरजवंताला वाजवी दरात अद्ययावत आरोग्यसेवा मिळावी, यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यामध्ये समाधानकारक बाब ही की, आता अगदी दुर्गम भागातील रुग्णांनाही अशा प्रगत आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होत आहेत. मिडास हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह प्रशस्त जागा आणि उत्कृष्ट सुविधा वाजवी दरात प्रदान करण्यात येणार आहेत.

गेल्या ४० वर्षांपासून गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी क्षेत्रात उत्कृष्टतेची परंपरा जपणाऱ्या मिडास हॉस्पिटलने आता कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स अशा अनेक सुपर स्पेशॅलिटी सेवा आणि सेंट्रल इंडियामधील पहिले GI (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल) सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे. आता रुग्णांना एकाच छताखाली त्याच्या सर्व वैद्यकीय गरजांसाठी विश्वासार्ह सेवा मिळणार आहे.

नागपूर येथील मिडास हॉस्पिटल ला त्यांच्या आपत्कालीन आणि ट्रॉमा केअर युनिटचे भव्य उद्घाटन करताना खूप आनंद होतो आहे ही एक अत्याधुनिक सुविधा आहे जी प्रगत २४ तास ट्रॉमा आणि आपत्कालीन सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहे.

ट्रॉमा विभागाच्या प्रमुख वैशिष्ट्ये

२४/७ आपत्कालीन सेवा अनुभवी ट्रॉमा तज्ज्ञ व नर्सेससह चौविस तास सेवा

२४/७ आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक: ९२२६४७१८३४

२४/७ अॅम्ब्युलन्स सेवा

अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट सिस्टम्स – व्हेंटिलेटर्स, कार्डियाक मॉनिटर्स, डिफिब्रिलेटर्स आदींनी सुसज्ज

ट्रॉमा टीमः कन्सल्टंट इमर्जन्सी मेडिसिन, ऑर्थोपेडिक सर्जन, ट्रॉमा सर्जन, न्यूरोलॉजिस्ट, जनरल सर्जन, न्यूरोसर्जन, स्पाईन सर्जन, प्लास्टिक सर्जन, ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन, व्हॅस्क्युलर सर्जन, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट, अॅनेस्थेसियोलॉजिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट यांचा समावेश

सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा-रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सुरक्षित व आरामदायक वातावरण

रुग्णालय व्यवस्थापनाचा संदेश

“आमचा उद्देश आमच्या रुग्णांना सर्वोत्कृष्ट दर्जाची सेवा देण्याचा आहे आणि ट्रॉमा विभागाचे उद्घाटन ही त्या दिशेने टाकलेली एक महत्त्वाची पायरी आहे,” असे डॉ. श्रीकांत मुकेवार, संचालक आणि वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, मिडास हॉस्पिटल यांनी माध्यमांना सांगितले.

“सेंट्रल इंडिया विभागात वैद्यकीय सेवा व्यापकपणे उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. आमची अनुभवी ट्रॉमा टीम आणि अत्याधुनिक सुविधा या भागातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहेत,” असे डॉ. सौरभ मुकेवार, संचालक आणि वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट यांनी आपली दृष्टीकोन मांडताना सांगितले.

मिडास हॉस्पिटल हे नागपूरमधील एक आघाडीचे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल असून, विविध वैद्यकीय सेवांमध्ये ते उत्कृष्ट उपचार सुविधा पुरवते. अनुभवी डॉक्टर्स आणि अत्याधुनिक उपकरणांमुळे रुग्णांना सर्वोत्तम सेवा मिळते.

 

- Advertisment -