
वोक्हार्ट हॉस्पिटल्सने अवयवदान जनजागृती मोहिम राबवली
वैद्यकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येत दिला जीवनदायिनी संदेश
या मोहिमेद्वारे नागपूर, मुंबई सेंट्रल आणि मीरा रोड येथे 5,000 हून अधिक लोकांना अंगदानाबाबत जागरूक करण्यात आले
नागपूर : वोक्हार्ट हॉस्पिटल्सने 11 जुलै ते 11 ऑगस्ट 2025 दरम्यान नागपूर, मुंबई सेंट्रल आणि मीरा रोड येथील हॉस्पिटल्स आणि आजूबाजूच्या भागांमध्ये “तुमचा शेवटचा निर्णय सर्वात महान ठरू शकतो!” या संकल्पनेवर आधारित एक महिन्याची अवयवदान जनजागृती मोहीम यशस्वीरित्या राबवली. या मोहिमेचा उद्देश लोकांमध्ये अवयवदानाविषयी खुलेपणाने चर्चा घडवून आणणे आणि सर्व धर्मातील लोकांमध्ये व समाजांमध्ये या विषयाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
या जनजागृती उपक्रमात हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय आध्यात्मिक धर्मगुरू, अवयव ट्रान्सप्लांट तज्ज्ञ, तसेच अवयवदान करणाऱ्याऱ्यांचे आणि अवयव मिळवणाऱ्याऱ्यांचे कुटुंबीय यांना एकत्र आणले गेले, जेणेकरून वैद्यकीय व सामाजिक दृष्टिकोनातून अंगदानाच्या संकल्पनेला सहज स्वीकारले जावे.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग म्हणून, वोक्हार्ट हॉस्पिटल्सने धर्मगुरू आणि ट्रान्सप्लांट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने हा उपक्रम राबवला. यामागचा उद्देश असा होता की, अंगदान ही केवळ वैद्यकीयदृष्ट्या नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही समर्थित असलेली एक उदात्त आणि करुणामय कृती आहे, असा स्पष्ट संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे.
या कार्यक्रमात बोलताना हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाचे आदरणीय धर्मगुरूंनी सांगितले, “जीवदान’ म्हणजे जीवन देण्याची संकल्पना जी आपल्या धर्मग्रंथांमध्ये स्पष्टपणे सांगितलेली आहे. अवयवदान ही केवळ मान्य असलेली गोष्ट नाही, तर ती एक पवित्र जबाबदारी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जगण्याची संधी देतो, तेव्हा ती व्यक्ती सर्व कर्मांच्या सीमा ओलांडते. ही दयाळूपणाची सर्वोच्च पातळी आहे, जिथे एखाद्याचा मृत्यू दुसऱ्याच्या आशेची सुरुवात बनतो. अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे आपण आपल्या मानवी आयुष्याला एका आध्यात्मिक प्रवासात रूपांतरित करतो.”
डॉ. स्वप्निल शर्मा, सिनियर लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स यांनी सांगितले, “भारतामध्ये अवयव न मिळाल्यामुळे दरवर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो, जो टाळता येऊ शकतो. आमच्या शस्त्रक्रिया टीम आणि आयसीयू पूर्णपणे सज्ज आहेत, पण तरीही अनेकदा कुटुंबीय संकटाच्या क्षणी निर्णय घेण्यास मागे हटतात. जर जास्तीत जास्त लोकांनी जिवंतपणीच अवयवदानाची इच्छा कुटुंबीयांशी बोलून ठेवली, तर मृत्यूनंतर हजारो लोकांचे जीव वाचवता येतील. आज अडचण विज्ञानात नाही, तर संवादाच्या अभावामध्ये आहे. आणि हा संवाद आपल्याला प्रत्येक घरात सुरू करण्याची गरज आहे.”
डॉ. सुर्याश्री पांडे-नेफ्रॉलॉजिस्ट आणि लिव्ह ट्रान्सप्लांट कन्सल्टन्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स यांनी सांगितले, “एक अवयवदाता आठ जीव वाचवू शकतो. ही एक चमत्कारांची साखळी आहे, जी एका साध्या संवादातून सुरू होते. आज लोकांमध्ये जागरूकता वाढताना दिसत आहे, पण त्या जागरूकतेला कृतीत रूपांतरित करणे हे खरे आव्हान आहे. जसे आपण इतर जीवनाशी संबंधित निर्णयांवर घरामध्ये मोकळेपणाने चर्चा करतो, तशीच चर्चा अवयवदानाबाबतही व्हायला हवी. जेव्हा एखाद्याची इच्छा आधीच माहीत असते, तेव्हा नातेवाईक आत्मविश्वासाने आणि ठामपणे त्यासाठी ‘हो’ म्हणू शकतात.”
डॉ. पीयूष मारुडवार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट कन्सल्टन्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स यांनी सांगितले कीः “अंगदानाची चर्चा ही नेहमीच्या आरोग्यविषयक चर्चाचा भाग असली पाहिजे, ती शेवटच्या क्षणासाठी राखून ठेवलेला भीतीचा विषय नसावा. यकृत हे अशा काही अवयवांपैकी एक आहे जे पुन्हा निर्माण होऊ शकते, तरीही अनेक जीव केवळ दात्याच्या प्रतीक्षेत गमावले जातात. या विषयावर कुटुंबांमध्ये आणि तरुणांमध्ये सुरुवातीपासूनच चर्चा झाली पाहिजे, जेणेकरून अंगदान हा एक भीतीचा विषय नव्हे, तर नैसर्गिक आणि सकारात्मक निर्णय बनू शकतो. आज घेतलेली प्रत्येक प्रतिज्ञा कोणाच्यातरी उद्याचे आयुष्य बदलू शकते.”
ही मोहीम समुदाय पातळीवरील जनजागृती आणि डिजिटल माध्यमातून कथा सांगणे या दोन टप्प्यांमध्ये राबवण्यात आली. हॉस्पिटल्स, कॉर्पोरेट कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी क्यूआर कोड आणि फिजिकल फॉर्मद्वारे नावनोंदणी करता येईल असे डोनर रजिस्ट्रेशन बूथ्स लावण्यात आले. हे बूथ्स अनेकदा मोफत आरोग्य तपासणी शिबिरांसोबत लावले गेले, ज्यामुळे वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील लोक सहभागी झाले. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी खास वेबिनार घेण्यात आले, तर कॉर्पोरेट क्षेत्रातील सहकाऱ्यांसाठी दुपारच्या सुट्टीत अवयवदान जागरूकता सत्रे आणि डोनर संकल्प मोहिमांमध्ये सहभाग घेतला.
डिजिटल माध्यमातून ही मोहीम आणखी प्रभावी बनवण्यात आली. खऱ्या डोनर्स, अवयव प्राप्तकर्ते आणि डॉक्टरांचे छोटे भावनिक व्हिडिओ आणि अनुभव कथन सोशल मीडियावर शेअर करण्यात आले, ज्यामुळे लोकांशी भावनिक संबंध निर्माण झाला.
श्री. रवी बागली, सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स यांनी मोहिमे बद्दल भाष्य करताना सांगितले: “या मोहिमेचे
सकारात्मक परिणाम आधीच स्पष्टपणे दिसू लागले आहेत. वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अंगदानासाठी नोंदणी करणाऱ्याऱ्यांची संख्या वाढली आहे आणि डिजिटल व प्रत्यक्ष माध्यमांतून लोकांचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही मोहीम केवळ वैद्यकीय प्रक्रियांपुरती मर्यादित नाही, तर विश्वास, सहानुभूती आणि खुलेपणाची संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा आपण आरोग्यसेवा आणि आध्यात्मिक मूल्ये यांना एकत्र आणतो, तेव्हा लोकांसोबत अर्थपूर्ण संवाद घडवून आणण्यासाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण होते.”
समारोप कार्यक्रमात अनेक भावनिक क्षण पाहायला मिळाले. अवयव दान करणाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या धैर्य आणि संवेदनशीलतेबद्दल सन्मानित करण्यात आले. अवयव प्राप्त करणाऱ्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले की, एका अनोळखी व्यक्तीच्या निर्णयामुळे त्यांचे आयुष्य कसे बदलले. उपस्थितांनी सामूहिक प्रतिज्ञेत भाग घेतला आणि आपली अवयव दान करण्याची इच्छा कुटुंबीयांना सांगण्याचे वचन दिले.
वोक्हार्ट हॉस्पिटल्स बद्दल
वोक्हार्ट हॉस्पिटल्स लि. ही एक सुपर स्पेशॅलिटी तृतीय श्रेणीची हॉस्पिटल साखळी आहे, ज्याची हॉस्पिटल्स नागपूर, राजकोट, साउथ मुंबई आणि नॉर्थ मुंबई येथे आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुरक्षित रुग्णसेवा यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटल्स ओळखले जाते. रुग्णांची सुरक्षितता आणि दर्जेदार उपचार ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. “रुग्णांचे जीवन अधिक समृद्ध करणे” हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट असून, देशातील काही व्यावसायिक पद्धतीने चालवले जाणारे कॉर्पोरेट हॉस्पिटल ग्रुप्सपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे.