सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

डिजिटल माध्यम उभारणार ‘डिजिटल हाऊस’!

डिजिटल माध्यम उभारणार ‘डिजिटल हाऊस’ !

नागपूर डिजिटल संघाच्या बैठकीत निर्णय

नागपूर : येथील डिजिटल माध्यम आता ‘ॲक्शन’ मोडवर दिसत आहे. बदलत्या काळानुसार डिजिटल मिडिया न्यूज पोर्टल संघ नागपूरात भव्य असा ‘डिजिटल हाऊस’ उभारणार आहे. शनिवार (१३ सप्टेंबर) रोजी रविभवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डिजिटल मिडिया न्यूज पोर्टल संघाचे अध्यक्ष भीमराव लोणारे, सचिव विजय खवसे, सिनियर जर्नालिस्ट ममता खांडेकर, अमित वानखेडे यांच्या नेतृत्वात हि बैठक पार पडली. 

नुकतेच, नागपूर प्रेस क्लब येथे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रिन्ट, इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या निवडक संपादक व पत्रकारांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकित डिजिटल माध्यमांच्या संपादकांना डावलण्यात आले होते. नागपूर प्रेस क्लब तर्फे नेहमी डिजिटल माध्यमांच्या संपादकांसोबत सावत्र व्यवहार केला जातो.

त्यामुळे नागपूर प्रेस क्लब व टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेला डिजिटल माध्यमांच्या संपादकानी बहिष्कार टाकावा असा निर्णय एक मताने घेण्यात आला. नागपूर जिल्हा माहिती अधिकारी यांनी डिजिटल माध्यमांच्या संपादकांना सन्मान द्यावा, महाराष्ट्र शासना तर्फे डिजिटल माध्यमांना जाहिराती मिळाव्यात तसेच नागपुरात डिजिटल मिडिया हब उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अश्या अनेक विषयांवर या बैठकित चर्चा करण्यात आली. हिवाळी अधिवेशन काळात डिजिटल मिडिया न्यूज पोर्टल संघा तर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे.

या बैठकीला नागपूरातील डिजिटल माध्यमांचे ३० ते ४० संपादक उपस्थित होते. विशेष सांगायचे म्हणजे, जनग्रामीण पत्रकार संघाने डिजिटल मिडिया न्यूज पोर्टल संघाला समर्थन दिले आहे. आणखी काही पत्रकार संघटना डिजिटल मिडिया न्यूज पोर्टल संघाला समर्थन देणार असल्याचे संघाचे अध्यक्ष भीमराव लोणारे यांनी सांगितले.

- Advertisment -