सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

विकासाचा एक आदर्श मापदंड निर्माण करू : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विकासाचा एक आदर्श मापदंड निर्माण करू : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर – सुमारे २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून नागपूर महानगराच्या भविष्यातील गरजा ओळखून वेळोवेळी जे नियोजन केले, त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून विकासकामे करून घेतली त्यामुळे आजच्या घडीला नागपूर महानगर हे जागतिक नकाशावर विकासासाठी ओळखले गेले आहे. यापुढेही नागपूरच्या वाढत्या विस्ताराबरोबर येथील रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, सक्षम परिवहन यंत्रणा, जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा यावर प्राधान्याने भर देऊन विकासाचा एक आदर्श मापदंड निर्माण करू, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नागपूर जिल्ह्यातील विविध विकासकामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यादृष्टीने येथील जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सभापती संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी उपस्थित होते.

परिवहन सुविधेचे सक्षम जाळे उभारणार

नागपूरच्या विस्तारात सक्षम परिवहन सुविधेची आवश्यकता महत्वाची आहे. नागपूर महानगरासह जवळील भागात असलेल्या ग्रामीण भागातून हजारो लोक रोजगार व नोकरीनिमित्त मिहान, हिंगणा एमआयडीसी, कोराडी, वाडी, कळमना मार्केट, बुटीबोरी व अन्य भागात दररोज करतात. भविष्यातील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाला उत्तम गुणवत्तेच्या सुविधा मिळाव्यात यासाठी नागपूर महानगरपालिका, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मेट्रो आणि एसटी महामंडळामार्फत एक अभ्यासपूर्ण वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन नागपूरच्या २० किलोमीटर परिघात महागनरपालिकेचा परिवहन विभाग तर नागपूर विकास प्राधिकरणामार्फत त्यांच्या हद्दीत असलेल्या सुमारे ६५० गावांसाठी इलेक्ट्रीक बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागपूर महानगर अंतर्गत परिवहन सुविधेसाठी मेट्रोची उत्तमरीत्या उपलब्धी असून उर्वरित भागांसाठी एसटी महामंडळाची सुविधा राहील. या चारही संस्थांचा उत्तम समन्वय साधण्यात आला असून येथील भक्कम दळणवळणाच्या सुविधाही नागरिकांना चांगला दिलासा देणा-या ठरतील, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत आपण सर्वांसाठी घरे या निर्णयाप्रमाणे सुमारे ७५ हजार घरांबाबतचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून ही घरे आपण गरजू पात्र व्यक्तींना उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले.

अशी आहे विकासकामांची दिशा

सर्व विभागांच्या समन्वयात महसूल विभागाचा अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयाचा एक महत्वपूर्ण सहभाग असतो. नागपूरच्या विकासाबाबत शासनाने सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून जे धोरणात्मक निर्णय घेतले त्यासाठी लागणा-या जमिनीच्या उपलब्धतेसह अनेक कायदेशीर बाबी मार्गी लावण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यात सुमारे एक हजार १५० किलोमीटरचे पाणंद रस्ते उपलब्ध झाले आहेत. जिल्हा नियोजन व खनिज प्रतिष्ठान यांच्यामार्फत नागपूर जिल्ह्यात एक आदर्श काम झाले आहे. पाणंद रस्त्याला आपण फ्लाय अॅशची जोड देऊन यात अधिक मजबुती साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

गोरगरिबांना स्वतःच्या मालकीची घरे मिळावीत यासाठी नागपूर जिल्ह्यात आपण पट्टेवाटप योजनेला कालबद्ध गती दिली. यामुळेच आजवर सुमारे ३० हजारपेक्षा जास्त पट्टे गोरगरिबांना वाटप करता आले. झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार लवकरच जिल्ह्यातील सुमारे १५ हजार हेक्टर जमीन मोकळी करण्यात येईल. यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. याचबरोबर महसूल पातळीवर सर्वसामान्यांना कार्यालयीन कामकाजासाठी ज्या सातत्याने चकरा माराव्या लागत होत्या त्या ई नझुल मार्फत कमी केल्या आहेत. लोकांना घरबसल्या या प्रक्रियेत भाग घेता येणे शक्य झाले आहे. ज्यांची कुणाची प्रकरणे आहेत ती दहा दिवसात निकाली निघण्याची सुविधा यामुळे शक्य झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागाला तेवढ्याच सक्षमतेने विकासाच्या प्रवाहात येता यावे यासाठी जिल्हा परिषदेतअंतर्गत महिला सक्षमीकरण, आरोग्य, कुपोषण, पंचायत व शिक्षणावर आम्ही भर आहे. नुकतेच आम्ही जिल्ह्यातील सुमारे १६०० बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपये बीजभांडवल उपलब्ध करून दिले आहे. यातून अनेक भागात विविध लहान व्यवसायांना गती मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अधोरेखित करून जिल्हा परिषदेच्या कार्यालयात हेल्थ वॅार रूम कार्यान्वित करण्यात आली आहे. कोराडीसारख्या भागात अगरबत्ती व हॅन्डलुम उद्योगाचे क्लस्टर साकारले जात आहे. लहान मुलांच्या प्राथमिक शिक्षणासह आरोग्याच्या दृष्टीने अंगणवाड्या ह्या अधिक सक्षम होणे आवश्यक होते. यासाठी प्रती अंगणवाडी उपलब्ध असलेला तोकडा निधी लक्षात घेऊन त्याला आता जिल्हा वार्षिक योजनेची जोड देऊन जिल्ह्यात ४० आधुनिक अंगवाड्यांची उभारणी केली जात आहे. याव्यतिरिक्त ६० अंगणवाड्यांना एआय बेसची जोड देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी दिली.

मोकाट जनावरांसाठी देशातील पहिला नंदग्राम प्रकल्प होणार साकार

नागपूर महानगरपालिकेअंतर्गत विविध विकासकामांना गती मिळावी यासाठी शासनाने नुकताच ३१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात पूर्व व उत्तर नागपुरातील पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. पादचारी मार्गाची सुधारणा, रॅाक गार्डन, विविध ठिकाणी क्रीडांगणे, उद्यानाचे सौंदर्यीकरण, व्यायामशाळा आदी विविध विकासकामांसह भारतातील एक आदर्श प्रकल्प म्हणून ओळखला जाईल असा नंदग्राम प्रकल्प आम्ही साकारत असल्याचे महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी सांगितले.

रस्त्यावरील मोकाट जनावरांचा प्रश्न हा अत्यंत कुशलतेने हाताळता यावा व यात मोकाट प्राण्यांना कोणतीही बाधा न पोहोचविता त्यांना एका ठिकाणी सुरक्षित ठेवता यावे यादृष्टीने पारंपारिक कोंडवाड्याला प्रगत रूप देऊन हा नंदग्राम प्रकल्प साकारत असल्याचे ते म्हणाले. यात जवळपास ३ हजार ४६० मोकाट जनावरांना जागा उपलब्ध होईल. सुमारे १२२ जनावरांचे मोठे गोठे यात असतील. वाठोडा येथे हा प्रकल्प उत्तमरीत्य साकारला जावा असे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर महानगरातील परिवहन सुविधा भक्कम करण्यासाठी २५० ई बसेस उपलब्ध आहेत. लवकरच सर्व मिळून ही संख्या ६५० पेक्षा जास्त होईल. यातून सुखकर प्रवासाची अनुभूती नागपूरकरांना घेता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अमृत २ योजनेअंतर्गत पोहरा नदी प्रदूषण प्रकल्प, नाग नदी प्रदूषण निर्मूलनासाठी पुढील टप्पा, मोबीनपुरा येथे अत्याधुनिक ई लायब्ररी, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नारी येथे ५१८ सदनीकांचा प्रकल्प व सुमारे ५ हजार घरकूल साकारण्याबाबत प्रगती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पट्टेवाटप योजनेत नागपूर जिल्ह्यात अत्यंत व्यापक काम झाले आहे. मनपाच्या हद्दीतील व विशेषतः खाजगी जमिनीवर असलेल्या झोपडपट्टीमधील सुमारे ११० पट्टे वाटपासाठी तयार असून लवकरच त्याचे वाटप करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

नागपूर महानगरात अनेक मजली गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत. या इमारतीमध्ये भविष्यात आगीच्या घटना घडल्या तर त्यावर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी व सुरक्षिततेसाठी सुमारे ९० मीटर उंचीपर्यंत काम करता येईल, अशाप्रकारची वाहन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे सुमारे २२ अगनीशमन केंद्र नागपूर महानगरात सुरू करण्याबाबत नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. लाड पागे समितीच्या शिफारशींना विचारात घेऊन शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सुमारे ५ हजार लोकांना याचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगून ४०० सफाई कामगारांना घरकुल योजनांची त्यांनी माहिती दिली.

नवीन नागपूरसाठी बाह्यवळण रस्ता व चार मोठे ट्रान्सपोर्ट प्लाझा

नवीन नागपूर साकारताना भविष्यातील गरजा व पायाभूत सुविधांचा वेध घेऊन बाह्यवळण रस्ता, चार मोठे ट्रान्सपोर्ट प्लाझा शासनाच्या विविध विभागाकडे असलेल्या २ हजार ८३३ हेक्टर जमिनीच्या देखभालीसाठी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, नागरी परिवहन आणि विदर्भातील वाढत्या औद्योगिक विकासाला डोळ्यापुढे ठेवून इंडस्ट्रीअल कॅारिडोअर निर्माण करण्याची तयारी पूर्ण झाल्याचे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सभापती संजय मिणा यांनी सांगितले. नागपूर बाह्यवळण मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. यासाठी नऊ तालुक्यातील ९९ गावांमधील अंदाजे १ हजार ६९७. १८ हेक्टर आर जमीन यासाठी संपादित केली जाणार आहे. बाह्यवळण रस्तासाठी एकूण १३ हजार ७४८ कोटी खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन नागपूरसाठी मौजा गोधणी (रिठी), मौजा लाडगाव (रिठी), हिंगणा या महसुली गावांचे अंदाजे ६९२.६ हेक्टर आर एवढे आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

- Advertisment -