सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

विद्यापीठात हेक्सावेअर कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह 

विद्यापीठात हेक्सावेअर कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात हेक्सावेअर कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडला. महाराज बाग चौक स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात आयोजित प्लेसमेंट ड्राईव्हला विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. 

विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी श्री. हरीश पालीवाल, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन, हेक्सावेअर कंपनीच्या एचआर अंजली जेठानी व म्रीगांक अंबुलकर यांची उपस्थिती होती. हेक्सावेअर कंपनीकडून एक्झिक्यूटिव्ह व एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी या पदाकरिता हा प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला.

या पदाकरिता कमीत कमी बारावी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्र होते. या पदाकरिता २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर मुलाखतीकरिता प्रत्यक्ष ५० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. चाळणी परीक्षेनंतर मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीनंतर विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

- Advertisment -