एच.एस.महात्मे संस्कार विहार स्कूलचा खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या गीत गायनात सहभाग
एशिया वर्ल्ड रेकॉर्ड व वर्ल्ड बुक ऑफ इंडिया मध्ये शाळेची नोंद !
नागपूर : यंदाच्या खासदार महोत्सवाच्या गीत गायनात रमानगर येथील एच.एस.महात्मे संस्कार विहार शाळेचा सहभाग होता. एशिया वर्ल्ड रेकॉर्ड व वर्ल्ड बुक ऑफ इंडिया मध्ये या शाळेची नोंद करण्यात आली आहे. एकूण शहरातील 52,735 विद्यार्थ्यांनी गीत गायन केले.
भव्य आणि यशस्वी उपक्रमात सहभागी होण्याचे भाग्य शाळेतील विद्यार्थ्यांना लाभल्या बद्दल आभार मानले. ही अनुभूती आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि अभिमानास्पद क्षण ठरली आहे. सर्व पालकांनी जे सहकार्य केले त्याबद्दल संपूर्ण महात्मे टीम कडून खुप खुप धन्यवाद आपले सहकार्य असेच पुढेही लाभेल अशी आशा व्यक्त करण्यात आली. आपल्या संस्कारांचा, एकतेचा आणि देशप्रेमाचा संगम या उपक्रमातून झळकला आणि हेच आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती आणि गीता परिवार यांचे खुप खुप आभार मानण्यात आले.


