सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

गुरूंच्या सेवेसाठी आम्ही सर्व शिख समुदाय एकसंघ होवून कार्यक्रम यशस्वी करू

गुरूंच्या सेवेसाठी आम्ही सर्व शिख समुदाय एकसंघ होवून कार्यक्रम यशस्वी करू

विदर्भ अध्यक्ष सरदार गुरुमितसिंग खोक्कर 

विविध समिती प्रमुखांना दररोज आढावा घेण्याचे निर्देश

नारा येथे होणाऱ्या हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब कार्यक्रमाच्या समन्वयासाठी युवक होणार स्वयंसेवक

नागपूर : हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिद शताब्दी समारोहानिमित्त नारा येथे येत्या 7 डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या सत्संग, लंगर व इतर कार्यक्रमांच्या नियोजनासाठी शासनाच्या विविध समित्यांसह शिख समाज बांधव तत्परतेने आपल्या सेवेसाठी जोडला गेला आहे.

जिल्हा पातळीवरील विविध विभाग प्रमुखांची व्यापक समिती तयार करण्यात आली आहे. या समारोहास विदर्भातील सर्व जिल्ह्यामधून सूमारे 5 लाखांपेक्षा अधिक सर्व धर्म भाविक जमणार आहेत. यात शिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, संत नामदेव महाराजांचे भक्त मोठ्या संख्येने यात सहभाग घेत आहेत.

गुरूंच्या सेवेसाठी आम्ही सर्व शिख समुदाय एकसंघ होवून कार्यक्रम यशस्वी करू असा विश्वास हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर 350 व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीचे विदर्भ अध्यक्ष सरदार गुरुमितसिंग खोक्कर यांनी व्यक्त केला.

नारा येथे 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रम स्थळी विविध समित्यांच्या आढावा बैठकीत श्री. खोक्कर बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक, नागपूर क्षेत्रीय समितीचे सह-अध्यक्ष परमजित सिंग भट्टी, सचिव प्रीतपाल सिंग भाटीया, गजेंद्रसिंग लोहिया, कुकू मारवा, गुरदयाल सिंग पड्डा, मालजीतसिंग बल, टिटू ढिल्लो, ओंकारसिंग बैन्स, सुखविंदरसिंग गिल, हरजितसिंग बग्गा, गुरप्रतापसिंग व नागपूर येथील गुरुद्वाराचे समस्त शिख, सिकलगार, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी शासकीय विभाग प्रमुखांची विशेष आढावा बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाच्या नियोजनात कोणतीही कमतरता पडू नये याची दक्षता समितीतील सदस्यांनी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

विदर्भातील अत्यंत महत्वाचा कार्यक्रम म्हणून याकडे पाहिले जात असून कोणत्याही भाविकाला तत्काळ मार्गदर्शन व्हावे, त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा व सुविधांमध्ये समन्वय रहावा, वाहन व्यवस्थेबाबत त्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी राष्ट्रीय छात्र सेना, स्कॉऊट, विविध क्रीडा व सांस्कृतिक संघटनेतील युवा सदस्य यांना स्वयंसेवक म्हणून संधी दिली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी बैठकीत सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सहभागी युवकांना शासन व संयोजन समितीच्या वतीने विशेष प्रमाणपत्र बहाल केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

- Advertisment -