सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

पॉलिसीबाजारचा नागपूरमध्ये विस्तार; मार्केट-लिंक गुंतवणूक आणि टर्म इन्शुरन्सची मागणी वाढली

पॉलिसीबाजारचा नागपूरमध्ये विस्तार; मार्केट-लिंक गुंतवणूक आणि टर्म इन्शुरन्सची मागणी वाढली

नागपूर : भारताच्या आघाडीच्या ऑनलाइन इन्शुरन्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या पॉलिसीबाजारने आज नागपूर येथे आयोजित प्रेस इंटरॅक्शनमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पश्चिम भारतात इन्शुरन्स आणि गुंतवणूक प्रोडक्ट्सबद्दल वाढती जागरूकता आणि मागणी असल्याचे सांगितले. तरुण, महत्वाकांक्षी ग्राहक वर्ग आणि मार्केट-लिंक गुंतवणुकीतील वाढती रुची पाहता, नागपूर पॉलिसीबाजारच्या लाईफ इन्शुरन्स आणि गुंतवणूक उत्पादनांसाठी महत्त्वाचा बाजारपेठ बनला आहे.  

कंपनीने सांगितले की, भारताच्या व्यापक आर्थिक वाढीमुळे घरगुती खर्च वाढत आहे, लोक वित्तीय बाजारात जास्त सहभागी होत आहेत आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याकडे लक्ष देत आहे. या भागातील ग्राहक महागाईवर मात करणारे परतावे मिळवण्यासाठी इक्विटी-लिंक्ड प्रोडक्ट आणि निवृत्ती नियोजन उपायांकडे वळत आहेत, तसेच आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

या कार्यक्रमात बोलताना, पॉलिसीबाजारचे डायरेक्टर श्री प्रदीप यादव म्हणाले, “पश्चिम भारतात लोकांच्या पैशांविषयी विचार करण्याच्या पद्धतीत स्पष्ट बदल दिसत आहे. आज ग्राहक फक्त संरक्षणावर लक्ष देत नाहीत, तर भारताच्या आर्थिक वाढीत भाग घेण्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणुकीवरही भर देत आहेत. तरुण लोकसंख्या, वाढते शेअर बाजार आणि वाढती जागरूकता हे मार्केट-लिंक गुंतवणूक आणि निवृत्ती उपायांची मागणी वाढवत आहे. नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये आमची उपस्थिती असल्यामुळे आम्ही ग्राहकांना वैयक्तिक मार्गदर्शन देऊ शकतो आणि त्यांच्या जीवनाच्या उद्दिष्टांनुसार, जोखीम क्षमतेनुसार आणि दीर्घकालीन गरजांनुसार योग्य प्रोडक्ट निवडण्यास मदत करू शकतो.”

प्रीमियम माफ करण्याच्या योजनांना वाढती पसंती

तरुण ग्राहकवर्ग आता जास्तीत जास्त इक्विटी-लिंक्ड प्रोडक्ट निवडत आहेत. यामध्ये प्रीमियम माफी (वेव्हर ऑफ प्रीमियम) असलेल्या योजनांची मागणी लक्षणीयरीत्या वाढत आहे. कारण या योजना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास आणि आर्थिक संरक्षण देण्यास मदत करतात. या योजनांनुसार, ग्राहक एखाद्या अनपेक्षित परिस्थितीत प्रीमियम भरण्यास सक्षम नसल्यास, विमा कंपनी त्यांच्या वतीने प्रीमियम भरण्याची जबाबदारी घेते. 2023 ते 2025 दरम्यान अशा प्रिमियम माफ करण्याच्या योजनांची मागणी सहापट वाढली असून, आता या योजना पॉलिसीबाजारच्या एकूण बचत व्यवसायाचा सुमारे एक-चतुर्थांश भाग बनल्या आहे.

निवृत्ती नियोजनाची मागणी वाढत आहे

निवृत्ती नियोजनाबाबत सर्वच प्रकारच्या ग्राहकांमध्ये रस वाढत आहे. 2022 पासून निवृत्ती-केंद्रित योजनांसाठी चौकशी दुप्पट झाली आहे. ग्राहक सुरक्षित दीर्घकालीन उत्पन्न किंवा निवृत्ती निधी देणाऱ्या गुंतवणुकीच्या संधी शोधत आहेत, ज्यात मार्केट-लिंक्ड पेन्शन, अॅन्युइटी आणि निश्चित परतावा देणाऱ्या योजना यांचा समावेश आहे.

उच्च उत्पन्न असलेल्या (एचएनआय ) ग्राहकांचा सहभाग वाढत आहे

उच्च उत्पन्न (एचएनआय) असलेले ग्राहक आता ऑनलाइन उपलब्ध असलेल्या बचत आणि टर्म इन्शुरन्स योजनांमध्ये अधिक रस दाखवत आहेत. बचत उत्पादांमध्ये, एचएनआय ग्राहकांचा वाटा आता जवळपास एक-पंचमांश आहे, जे 2023 च्या तुलनेत तीनपट आहे. टर्म इन्शुरन्समध्ये, 2023 पासून एचएनआय ग्राहकांचा मासिक सहभाग 75 टक्क्यांनी वाढला असून, एकूण व्यवसायात त्यांचा वाटा सुमारे एक-पंचमांश आहे.

टर्म इन्शुरन्सची मागणी

टर्म इन्शुरन्सच्या मागणीत सातत्याने मजबूत वाढ दिसून येत आहे. यामागे मुख्यत्वे तरुण आणि वेतनधारक ग्राहक आहेत, जे साधारणपणे वेगाने वाढणाऱ्या उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. एकूण मागणीत वेतनधारकांचा वाटा सुमारे तीन-चतुर्थांश आहे आणि 2023 ते 2025 या कालावधीत या वर्गात 65 टक्क्यांची वाढ झाली आहे. 25 ते 40 वयोगटातील मासिक ग्राहकांची संख्या दुप्पट झाली असून, लवकर वयात आर्थिक संरक्षणाबाबत वाढती जागरूकता यामधून दिसून येते.

इन्शुरन्सच्या संपूर्ण प्रवासात मदत

पॉलिसीबाजार आपल्या ग्राहकांना विम्याशी संबंधित प्रत्येक टप्प्यावर मदत करण्यावर सातत्याने भर देत आहे. योजना तुलना करण्यापासून ते खरेदी आणि गरजेच्या वेळी क्लेम दाखल करण्यापर्यंत, कंपनी प्रत्येक पावलावर ग्राहकांच्या सोबत उभी आहे. समर्पित सल्लागार आणि क्लेम सपोर्ट टीमद्वारे, कंपनी ग्राहकांना उत्पादनांची वैशिष्ट्ये, पॉलिसीची सविस्तर माहिती आणि अटी व आवश्यक कागदपत्रे स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने समजून घेण्यास मदत करते. ही संपूर्ण प्रक्रिया कुटुंबांचा तणाव कमी करण्यासाठी, पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि योग्य वेळी आवश्यक मदत देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

नागपूर आणि पश्चिम भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये इन्शुरन्सविषयीची जागरूकता वाढत असताना, पॉलिसीबाजार ग्राहकांना योग्य माहिती आणि तज्ज्ञ मार्गदर्शन देऊन सक्षम बनवण्याच्या आपल्या ध्येयाला अधिक मजबूत करत आहे.

- Advertisment -