कॅन्सर रुग्णांसाठी नवीन सुविधा, मैक्स हॉस्पिटल नागपूरने आधुनिक रेडिएशन कॅन्सर उपचार केंद्र केले सुरू
नागपूर : मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूरने प्रदेशातील कॅन्सर उपचार सेवा मजबूत करण्यासाठी मोठे पाऊल उचलत उच्च अचूकतेचे रेडिएशन ऑन्कॉलॉजी केंद्र सुरू केले आहे. हे नवीन केंद्र हॉस्पिटलच्या तंत्रज्ञानावर आधारित, जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचार रुग्णांच्या घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

या केंद्राचे उद्घाटन डॉ. कौस्तव तालपात्रा, प्रिन्सिपल डायरेक्टर रेडिएशन ऑन्कॉलॉजी आणि लीड -अकॅडेमिक्स व क्लिनिकल रिसर्च, नानावटी मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, मुंबई; डॉ. शिझान पेरवेझ, असोसिएट डायरेक्टर रेडिएशन ऑन्कॉलॉजी आणि रेडिओसर्जरी, मैक्स हॉस्पिटल, नागपूर; आणि श्री. घनश्याम गुसाणी, व्हाइस प्रेसिडेंट आणि युनिट हेड, मैक्स हॉस्पिटल, नागपूर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. कौस्तव तालपात्रा म्हणाले, “डूबीम लीनिअर अॅक्सेलेरेटर (LINAC) ने सुसज्ज, उच्च अचूकतेचे रेडिएशन ऑन्कॉलॉजी केंद्र रेडिओसर्जरी आणि रेडिओथेरपीच्या सेवेत मोठा प्रगतीचा टप्पा दर्शवतो. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विविध प्रकारच्या कॅन्सरवर उप-मिलीमीटर अचूकतेने उपचार करण्यास सक्षम करते, ज्यामुळे आजूबाजूच्या आरोग्यदायी ऊतकांचे संरक्षण होते. या तंत्रज्ञानामुळे उपचाराचा वेळही लक्षणीयरीत्या कमी होतो, जे रुग्णांसाठी आरामदायी आणि परिणामकारक ठरते.”

डॉ. शिझान पेरवेझ यांनी सांगितले, “आमचे उच्च अचूकता रेडिएशन ऑन्कॉलॉजी केंद्र वैयक्तिक, रुग्ण-केंद्रित कॅन्सर काळजी देण्यावर भर देते. तज्ज ऑन्कॉलॉजिस्ट आणि रेडिएशन थेरपिस्टच्या टीमच्या सहाय्याने आम्ही प्रत्येक रुग्णासाठी सुरक्षित, अचूक आणि सर्वोत्तम परिणाम देणारी सानुकूल उपचार योजना तयार करतो.”
उद्घाटन कार्यक्रमात नागपूरमधील प्रमुख सर्जन्स आणि क्लिनिशियन्स तसेच मैक्स हॉस्पिटल, नागपूरचे डॉक्टर उपस्थित होते. त्यांनी ऑनकोलॉजी टीमसोबत चर्चा केली आणि नवीन केंद्राचा सविस्तर मार्गदर्शित दौरा केला, ज्यात त्यांना केंद्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतींबद्दल माहिती दिली गेली.
या केंद्राच्या उद्घाटनासह, मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूर, मध्य भारतातील रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार देणारे महत्त्वाचे केंद्र बनत आहे आणि आधुनिक रेडिएशन ऑन्कॉलॉजी सेवा रुग्णांपर्यंत पोहोचवत आहे.
मॅक्स हेल्थकेअर बद्दल:
मैक्स हेल्थकेअर इन्स्टिटयूट लिमिटेड (मैक्स हेल्थकेअर) ही भारतातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा संस्थांपैकी एक आहे. ही संस्था उत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाच्या सहाय्याने उच्च दर्जाची रुग्णसेवा प्रदान करण्यास वचनबद्ध आहे.
मैक्स हेल्थकेअर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून, 20 आरोग्य सेवा केंद्रे (5200 वेड्सचे) चालवते. यामध्ये कंपनी आणि तिच्या उपकंपन्या, भागीदारीत असलेली आरोग्य केंद्रे आणि व्यवस्थापित आरोग्य सेवा केंद्रे यांचा समावेश आहे. या नेटवर्कमध्ये दिल्ली एनसीआर मधील साकेत (3 रुग्णालये), पटपडगंज, वैशाली, राजेंद्र प्लेस, द्वारका, नोएडा आणि शालीमार बाग येथे अत्याधुनिक श्रेणीची रुग्णालये आहेत. तसेच लखनऊ, मुंबई, नागपूर, मोहाली, बठिंडा, देहराडून येथे प्रत्येकी एक रुग्णालय आहे. याशिवाय गुरगाव आणि बुलंदशहर येथे दुय्यम आरोग्य केंद्रे तसेच नोएडा, लाजपत नगर (2) केंद्रे), पंचशील पार्क (दिल्ली एनसीआर) आणि मोहाली (पंजाब) येथे वैद्यकीय केंद्रे कार्यरत आहेत. मोहाली आणि बठिंडा येथील रुग्णालये पंजाब सरकारसोबत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेअंतर्गत चालवली जातात.
याशिवाय, मैक्स हेल्थकेअर “मैक्स @होम” आणि “मैक्स लॅब्स” या ब्रँड नावांखाली होमकेअर आणि पॅथॉलॉजी सेवा देखील पुरवते. “मैक्स@होम” घरीच आरोग्य आणि तंदुरुस्ती सेवा पुरवते, तर “मैक्स लॅब” रुग्णालयाच्या बाहेर देखील निदान सेवा प्रदान करते.
माहितीसाठी संपर्कः
श्रुती वर्मा shruti.verma@maxhealthcare.com /+९१९८११५६६९७५
मौसमी चक्रवर्ती Mousumi.chakraborty@maxhealthcare.com/ +९१८३७६९७८३७८


