सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयच बनविले भाजपचे कार्यालय !

आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयच बनविले भाजपचे कार्यालय !

पोलीस आयुक्तांच्या सभागृहातच घेतली पत्रकार परिषद

नागपूर: विधान परिषद सदस्य व भाजप चे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयालाच भाजपचे कार्यालय बनविले. चक्क पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहातच पत्रकार परिषद घेतली. विशेष सांगायचे म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे ज्या खुर्चीवर बसले होते, त्या खुर्चीच्या मागे तिरंगी झेंडा, पोलीसांचा झेंडा, पोलीसांचा लोगो लागलेला आहे.

 

भाजप चे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेस चे माजी शहर अध्यक्ष शेख हुसेन यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी शुक्रवार १७ जून रोजी दुपारी नागपूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयात आले होते. पोलीस भवन येथे पोलीस आयुक्तांचे कार्यालय आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस भवन येथील ६ व्या माळ्यावर असलेल्या पोलीसांच्या सभागृहात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात जे विवादित भाषण केले यासंदर्भात चर्चा केली. तसेच, शेख हुसेन यांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी सभागृहात नागपूर शहरातील इलेक्ट्रॉनिक व प्रिन्ट मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी शेख हुसेन यांच्या तक्रारी संदर्भात चर्चा केली. आणि ते लगेच पोलीस सभागृहातून निघून गेलेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस सभागृहातच पोलीस आयुक्त यांची खुर्ची बाजूला केली. आणि त्याच जागेवर दुसरी खुर्ची घेतली. खुर्चीच्या अगदी मागे तिरंगी झेंडा, पोलीसांचा झेंडा, पोलीसांचा लोगो आहे. आणि तेथेच पत्रकारांशी संवाद साधला. हे चित्र बघून सभागृहात उपस्थित असलेल्या अनेक पोलीसांच्या भोया उंचावल्या होत्या. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस भवनाच्या सभागृहालाच भाजपचे सभागृह बनविले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांना जर पोलीस आयुक्त यांना निवेदन द्यायचे होते, तर त्यांच्या कार्यालयात जाऊ नही निवेदन देता आले असते. पण चक्क बावनकुळे यांचे निवेदन स्विकारण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पोलीस भवन सभागृहात यावे लागले, हे विशेष. बावनकुळे यांना पत्रकारांशी संवाद साधायचा होता. तर या पोलीस भवनाच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधता आला असता. मात्र बावनकुळे यांनी असे न करता. पोलीस सभागृहातच पत्रकारांशी संवाद साधला. आणि पोलीस भवन सभागृहालाच भाजपचे सभागृह बनविले. यासंदर्भात पत्रकारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला. मात्र बावनकुळे यांनी उडवा उडविचे उत्तर दिले. पोलीस आयुक्त या गंभीर घटनेवर काय कारवाई करतात. याकडे नागपुरकरांचे लक्ष लागले आहे. शिष्टमंडळात आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी नगरसेवक बाल्या बोरकर, संजय भेंडे, शिवाणी दाणी, चंदन गोस्वामी यांच्यासह अनेक भाजपचे कार्यकर्ता व भाजपचे माजी नगरसेवक उपस्थित होते.

- Advertisment -