नागपूर जिल्ह्यातील १३९४ लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सन २०२१-२२ करिता दिली मंजुरी
नागपूर: नागपूर जिल्हा ग्रामीण भागातील जनतेच्या निवासाच्या सोयीकरिता रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत एकूण १३९४ लाभार्थ्यांना पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घरकुल निर्माण समिती मार्फत पात्र ठरविण्यात आले असून या नागरिकांचा निवासाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.
नागपूर जिल्हा ग्रामीण भागातील विविध तालुकानिहाय उद्दिष्ट्ये दिलेले होते त्यानुसार प्राप्त अर्जानुसार पात्र लाभार्थ्यांना आज मंजुरी देण्यात आली.
भिवापुर ६५, हिंगणा २४, कळमेश्वर ८५, कामठी ३०,काटोल ८०,कुही ७१, मौदा ४८, नागपुर (ग्रा) ४६, नरखेड १६०,पारशिवनी १२५, रामटेक १४६, सावनेर ६५, उमरेड ५५ अशी पात्र लाभार्थ्यांची संख्या आहे. या व्यतिरिक्त ३९४ पात्र लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादीला मंजुरी देण्यात आली आहे. प्रतीक्षा यादीतील ३९४ लाभार्थ्यांना २०२२-२३ च्या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे.
एकूण १३९४ लाभार्थी यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.