आषाढी एकादशी निमित्त लहान मुलांची दिंडी
नागपूर : आषाढी एकादशीचे औचित्य साधून महाल येथील स्वातंत्र्य वीर सावरकर विद्या भवन शाळेच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी चिमुकल्या मुलांनी विठ्ठल रुख्मिणी व वारकऱ्यांचा पोषाख घातला होता.
नर्सरी ते चौथ्या वर्गातील मुलांनी या दिंडी मध्ये सहभाग घेतला होता. वारकऱ्यांची संस्कृती जोपासण्याचा खरा संदेश या चिमुकल्या मुलांच्या माध्यमातून शाळेने दिला.
शाळेच्या पटांगणातच दिंडी फिरविण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक, संचालक, कर्मचारी शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.


