नागपूर : रविवारी नागपूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला.अवघ्या तासाभरात शहरातील रस्ते पाण्यात बुडाले. रस्त्यांना नदी, नाल्याचे स्वरुप आले होते. त्यामुळे साचल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते. पण सायंकाळी ७ वाजता नंतरच्या पावसाने नागपुर शहर पाण्यात बुडाले होते. संपूर्ण नागपुर जिल्ह्यालाच रविवारी पावसाने चांगलेच झोडपले.

सायंकाळी ७ वाजतानंतर अंदाजे एक ते दिड तास जो एकाच धारेचा पाऊस पडला. त्या पावसाने समतानगर, नारी, नारा, नागसेनवन, बाबा बुद्धाजी नगर, सदर माऊंट रोड, बर्डी, उप्पलवाडी, नरेंद्रनगर, बेसा, मानेवाडा, पोलीस लाइन टाकळी, टेका, सिद्धार्थनगर, भानखेडा, महाल परिसरातील रस्ते पाण्यात बुडाले होते. अनेक वसाहती मधील घरात पाणी शिरल्याने काही नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. जिल्हा व मनपा प्रशासनाने नदी, नाल्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. ४८ तासात जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.


