सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्था, कंपन्यांनी मनुष्यबळाची माहिती ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन

मुंबईदि. २१ : मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व संस्था व कंपन्यांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती (ER-I) राज्य शासनाच्या कौशल्य विकासरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाच्या http://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहेअशी माहिती मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रविंद्र प्र. सुरवसे यांनी दिली. ही माहिती मुदतीत भरण्यात यावीअसे आवाहन त्यांनी केले आहे.

सेवायोजना कार्यालय कायदा १९५९ अन्वये रिक्त सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीयनिमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील कायद्याअंतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुषस्त्री अशी एकूण सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस सादर करणे बंधनकारक आहे. सर्व आस्थापनांकडून १०० टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. सर्व आस्थापनांना यापूर्वीच यूजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्यांचा वापर करून प्रत्येकाने या विभागाच्या http://mahaswayam.gov.in संकेतस्थळावर लॉगिन करावे व कायद्याचे अनुपालन करावेअसे आवाहन केले आहे.

यासंदर्भात माहितीसाठी mumbaicity.employment@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई शहर कार्यालयश्रेयस चेंबर्स१ ला माळा १७५डि.एन. रोडफोर्ट मुंबई – ४००००१ या पत्त्यावर संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -