मेट्रो आणि परंपरागत मारबत यांची पहिली भेट
नागपूर: चितार ओळी चौकात उपस्थित जनसमुदाय मारबत भेटीचे दृश्य बघून भावविभोर झाला. महा मेट्रो तर्फे चितार ओळी मेट्रो स्टेशन जवळील चौकातील पिलर वर अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मारबत मिरवणुकीला स्थायी चित्रांच्या माध्यमाने स्थापित केले आहे. सकाळ पासूनच चितार ओळी चौकात मारबत भेटीचे दृश्य बघण्या करता नागपूरकरांनी गर्दी केली होती.
दोन मारबत चे मिलन: जागनाथ बुधवारी, इतवारी येथून मारबत आणि बडगे मोठ्या जनसमुदाया सोबत निघाली. मेट्रो च्या पिलर वर साकारलेल्या काळी मारबत ला भेटायला मिरवणुकीतील काळी मारबत पुढे सरसावली आणि अभिवादन केले. मारबत मिलन च्या या क्षणी चितार ओळी चौकात नागपूरकरांनी भरभरून पुष्प आणि
गुलाल वृष्टी केली. चितार ओळी चौकात झालेल्या मारबत भेटीच्या या विहंगम दृश्याला बघण्या करता नागरिकानीं गर्दी केली होती.

काळी मारबत च्या पाठोपाठ पिवळी मारबत चितार ओळी चौकाच्या दिशेने पुढे आली. मेट्रो पिलर वर निर्मित पीवळी मारबत आणि मिरवणुकीचा भाग असलेली पिवळी मारबत एक दुसऱ्याच्या समोर आल्यात. मेट्रो पिलर वरील आणि मिरवणुकीचा भाग असलेली पिवळी मारबत समोरा-समोर आले. पिवळी मारबत समिती चे अध्यक्ष श्री प्रकाश गौरकर, इतर पदाधिकारी आणि भाविकानीं मारबतची पुजा-अर्चना केली. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मारबत मिरवणुकीचे स्वागत केले.
नागपुरात पहिल्यांदाच अश्या प्रकारे दोन – मेट्रो पिलर वरील आणि मिरवणुकीतील – काळी आणि पिवळी मारबत ची भेट झाली. मारबत भेटीचे हे दृश्य नागपूरकरांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले. काळी आणि पिवळी मारबत सुमारे ३० मिनिटे चितार ओळी चौकात स्थिती होते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला होता.
शहरातील मारबतीच्या या परंपरेचे जतन केल्या बद्दल नागपूरकरांनी मेट्रोला धन्यवाद दिले आहेत. या माध्यमाने हि अनोखी परंपरा मेट्रो पिलारवार येते अनेक वर्षे जिवंत राहणार असल्याचे नागपायरकरांनी म्हटले आहे.


