नागपूरात हिवाळी अधिवेशन, PWD चे अधिकारी झाले मालामाल !
रविभवनावर ७५ कोटी तर आमदार निवासावर ७० कोटींचा खर्च !
नागपूर : सोमवार (१९ डिसेंबर) पासून हिवाळी अधिवेशनला नागपूरात सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या तयारीसाठी शिंदे-फडणवीस सरकारने PWD च्या माध्यमातून जवळपास १७० कोटींचा खर्च केला आहे. यात रविभवनावर अंदाजे ७५ कोटी व आमदार निवासावर ९५ कोटींचा खर्च केला आहे. अधिवेशनाच्या तयारीत PWD चे अधिकारी चांगलेच मालामाल झाले असल्याची चर्चा आहे.
कोरोना संसर्ग संपल्यानंतर दोन वर्षाने नागपूरात हिवाळी अधिवेशन होत आहे. दोन ते तिन महिण्यांपासून PWD ने अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात केली आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार रविभवन येथील रंगरंगोटी व इतर कामांवर PWD ने अंदाजे ७५ कोटींचा खर्च केला तर आमदार निवासावर ९५ कोटींचा खर्च केला आहे. यंदा ४० ते ४५ कोटींनी खर्च वाढला असल्याची माहिती आहे. यात मात्र PWD चे अभियंता चांगलेच मालामाल झाले आहेत.
२०१९ मध्ये अधिवेशनाच्या तयारीसाठी एकूण ६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या वर्षी १०० कोटींच्यावर खर्च झाल्याची माहिती PWD च्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. केवळ दोन आठवड्यांच्या अधिवेशनासाठी एवढा खर्च करणे वाजवी नसल्याचे म्हटले जात आहे. तर एवढा अवाढव्य खर्च होण्याचे कारण PWD ने GST सांगितले आहे. २०१९ मध्ये बांधकामावर १२ टक्के जीएसटी लागायची. आता १८ टक्के लागत असल्याची माहिती PWD च्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. दोन वर्षांपासून कुठल्याच शासकिय निवासांची रंगरंगोटी व कोट झाले नव्हते. आता एका कोटऐवजी दोन कोट करावे लागले. त्यामुळे खर्च वाढला असल्याचे सुत्राने सांगितले.
PWD विभाग १ चे कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार यांच्याशी यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, की कोविड संक्रमणादरम्यान आमदार निवास कोविड केअर सेंटर होते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था रविभवन येथे करण्यात आली होती. त्यामुळे, पडदे, चादरी, सोफा कव्हर, ब्लँकेट, फर्निचर आदी बदलावे लागले. म्हणून, खर्च वाढला असल्याचे कुचेवार यांनी सांगितले. मात्र या कामात चांगलाच भ्रष्टाचार झाला असून PWD चे अधिकारी मालामाल झाले आहेत. विरोधकांनी अधिवेशनाच्या तयारीवर झालेल्या कोट्यावधिंच्या खर्चावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारावा अशी मागणी आहे.


