जयंत पाटलांना विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरणे महागात पडले, अधिवेशन काळापुरते निलंबन
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांना विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात सभागृह सुरु असताना अपशब्द वापरणे महागात पडले. पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपे पर्यंत निलंबित करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबन करण्याचा ठराव माडंला होता. विशेष म्हणजे, सहा वेळा सभागृह तहकूब झाले. विरोधकांनी सभात्याग केला.
विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सभागृहात संतापले होते. या संतापाच्या भरात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरला होता. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली.
सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली होती. या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगितही करण्यात आले होते. सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता.
त्यानंतर, विधानसभा अध्यक्ष यांनी जयंत पाटील यांचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपे पर्यंत त्यांना निलंबित केले. विरोधी पक्षनेते अजीतदादा पवार यांनी सभात्याग केला. हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस चांगलाच वादळी ठरला. सभासदांच्या गोंधळामुळे विधानसभा अध्यक्षांना सहा वेळा सभागृह तहकूब करावे लागले, हे विशेष.


