नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत
नागपूर : १०८ व्या भारतीय विज्ञान परिषदेच्या ( इंडियन सायन्स काँग्रेस ) उद्घाटनीय सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज विमानतळावर आगमन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात होणाऱ्या सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ३ ते ७ जानेवारी काळामध्ये १०८ वी इंडियन सायन्स काँग्रेस होत आहे.यासाठी देश विदेशातून शेकडो शास्त्रज्ञ नागपूर येथे येणार आहेत. विज्ञान ,तंत्रज्ञान व अन्य 14 क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग या परिषदेत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या व्यासपीठावरून महाराष्ट्रातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती विशद करणार आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत खासदार कृपाल तुमाने, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी यांनी केले.


