सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

स्टेरलाईट टेक्नोलॉजी लिमिटेडकडून पंचविसच्यावर कंत्राटदारांचे कोटयावधींचे बिल थकित !

स्टेरलाईट टेक्नोलॉजी लिमिटेडकडून पंचविसच्यावर कंत्राटदारांचे कोटयावधींचे बिल थकित !

नागपूर : गेल्या ३ वर्षापासून विदर्भातील शेकडो फायबर व्यवसायिकांना कोट्यावधीने फसविले जे देशातील नामांकित रिलायन्स जियो , एअरटेल , एकेएसईएनटीटी टेक सर्व्हिसेस ख्यातनाम असलेल्या वेदांता ग्रुपच्या स्टेरलाईट टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनी देशभरात करत आहे .

महाराष्ट्रासह विदर्भातही शेकडोच्यावर कंत्राटदारांना स्टेरलाईट लिमिटेड , आयडीया व्होडाफोन यांचे ऑप्टीकल फायबर केबलीच्या वर्कचे कामे टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीने दिडशे ते दोनशे कोटींचे फायबरची कामे 2019 पासून देण्यास सुरूवात केली . कोराना काळानंतर डिसेंबर 2022 पर्यंत दिलेल्या कामांना विदर्भासह नागपूरातील 20 ते 25 कंत्राटदारांनी प्रामाणिकपणे आपले कामे पूर्ण केली . परंतु , स्टेरलाईट टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीने केलेल्या कोटयावर्धीचे बिलांचे कामांचे पैसे थकित ठेवले आहे .

गेल्या ३ वर्षांपासून कांमाचे कोटयावधीचे बिले न मिळाल्याने कंत्राटदार कर्जबाजारी झाले आहे . सर्वच कंत्राटदार हे कर्जात इतके बुडाले असून त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देनेही शक्य होत नाही . यामुळे अनेकांना आपले घर विकण्याची वेळ येत आहे .

मानसिक त्रास ओढलेल्या नागपुरच्या २० ते २५ कंत्राटदारांना आता आत्महत्या करण्याची वेळ ओढावली आहे , अशी माहिती पत्रपरिषदेत माधवेंद्र राय यांनी दिली . यावेळी विवेक शर्मा , प्रमोद ठाकूर , अनिल पांडे , चांद भाई , राकेश धकाते , शैलेश तरसे , शशिकांत ढहरवार , महेश दिक्षीत , सुनिल गोटेकर , असरद भाई , अमित अखंड , विजयकांत राय , अंबर मलिक , सिकंदर भाई , पप्पु मलिक आदि कंत्राटरांची पत्रपरिषेदत उपस्थिती होती . पुढे बोलताना माधवेंद्र राय यांनी सांगितले की, नागपुरातील कश्यप कन्सट्रक्शन , द्वारकाधिश कन्स्ट्रक्शन , एमआरसी कन्स्ट्रक्शन प्रा . लिमिटेड , युनिव्हर्सल इंटरप्राईजेस , एस . एस . कम्युनिकेशन , ओमसाई कन्स्ट्रकश्न , सूर्या कन्सट्रक्शन , महेश इंटरप्राईजेस , साम कन्सट्रक्शन , श्री साई असो . , मल्लीक कंपनी , फोफले इंटरप्राईजेस , स्कॅय लाईन कम्युनिकेशन , अविनाश इंटरप्राईजेस , पार्थ कन्सट्रक्शन , वर्धराज कन्सट्रक्शन , पीपीएस इंटरप्राईजेस , राणा अर्थ मुव्हरसह अनेक कंत्राटदारांच्या कोटयावधींचे बिले कंपनीने अजुनही दिले नाही .

जेव्हा आम्ही कंत्राटदार स्टेरलाईट टेक्नोलॉजी लिमिटेड थकित बिलांसाठी कंपनीकडे जातो तेव्हा कंपनी मुंबई , पुणे , हैद्राबाद आदि शहरातील कार्यालयातून बिले मंजूर न झाल्याचे कारणे देत आमची गेल्या 3 वर्षापासून फसवणूक करीत आहे . आम्ही जेव्हा कंपनीकडे आमच्या कॉन्ट्रॅक्टच्या कराराचे बिले तुम्ही का देत नाही अशी विचारणा केली तर उलट कंपनी आम्हाला ब्लॅक लिस्ट करण्याची धमकी देतात . तसेच मोठमोठया मंत्र्यांसोबत आमची ओळख आहे , तुम्ही आमचे काहीच करू शकत नाही अशी उलट धमकी स्टेरलाईट टेक्नोलॉजी लिमिटेडकडून आम्हाला सतत मिळत आहे.

रिलायन्स जियोचे मुकेश अंबानी , एयरटेलचे सुनिल भारतीय यांच्या सारखे अब्जोपतींचे कामे घेणाऱ्या स्टेरलाईट टेक्नोलॉजी लिमिटेड आपली सर्व कामे करूनही आमचेच दीडशे ते दोनशे कोटींचे बिले थकित ठेवून आम्हा सर्वच कंत्राटदारांना पूर्ण कर्जात बुडवित आहे . अनेकांना आपल्या कर्मचाऱ्यांचे पैसे देणेही शक्य होत नाही. तर काहींना घरदार विकण्याची वेळ येत आहे. ऐव्हढेच काय तर यावर्षी 2 व्यक्तींनी आत्महत्या सुद्धा केली.

आमच्या होत असलेल्या अन्यायाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय सुचना व प्रसारण मंत्रालयाचे मंत्री अश्विनी वैष्णव , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन आम्हास न्याय द्यावा . तसेच स्टेरलाईट टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आम्ही सर्वच करीत असल्याचेही माधवेंद्र राय यांनी केली.

- Advertisment -