जानकी नगरात महाशिवरात्री उत्सव रविवारी
प्रतिनिधी देवराव प्रधान
नागपूर : दक्षिण नागपूर येथे श्री हनुमान सेवा पंचकमेटी जानकी नगर च्यावतीने आयोजित महाशिवरात्री उत्सव जानकी नगरात आयोजित करण्यात आला आहे. श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह 12 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. 12 ते 19 दरम्यान संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केलेले आहेत.

धार्मिक व सामाजिक सोहळ्यात सर्व भक्तांनी सहभागी व्हावे. असे आयोजकांनी आवाहन केले आहे. १८ फेब्रुवारी ला शिवरात्री निमित्याने श्री ह भ प सुनील महाराज येरखेडे महारांजाचे कीर्तन रात्री ८ ते १० या दरम्यान होणार आहे. आणि रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी १:३० ते ४:०० वाजेपर्यंत सुनील महाराजांच्या काल्याचे किर्तन व महाआरती होईल. त्यानंतर सायंकाळी ७ ते १० भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा. असे जानकीनगर येथील आयोजन समितीने म्हटले आहे.


