समंजस्य पणा दाखविला असता तर पारतंत्र्य आले नसते
-सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
नागपूर : हिदुस्थान मुक्तीच्या प्रसंगात नागपूरकर भोसले आणि पेशवे आपआपल्या मार्गाने बिहारकडे निघाले, दरम्यन दोघेही आमरासमोर आले आणि पुढे कोण जाणार, बिहार कोण काबिज करणार , अशी वादाची स्थिती निर्मरा ण झाली.
दोन्ही राजे शूर होते. परंतु राजे रघुजी भोसलें यांनी वादाला वाव न देता पेशवे यांना स्वारी करण्यास मार्ग दिला, राजे भोसले सारखा समंजसपणा सदासर्वदा आपल्यात असता तर हा देश पारतंत्र्यात कधीच गेला नसता, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
श्रीमंत राजे रघुजी भोसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट यांच्या वतीने राजरत्न पुरस्कार वितरण महालमधील मोठ्या राजवाड्यात झाले. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला श्रीमंत राजे रघुजी भोसले (पंचम) व श्रीमंत राजे मुधोजी भोसले (तृतीय) व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांद्वारे स्वराज्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यांच्या हयातीत दक्षिणमुक्त झाले. उत्तर, पूर्वमुक्तीचे अभियान नागपुरातून भोसले राज घराण्याच्या नेतृत्वाखाली चालले. राजे रघुजी भोसले अनासक्त राजे होते. बिहारवर स्वारी करण्याची वेळ आली तेव्हाच पेशवेसुद्धा तेथे पोहोचले होते. तेथे लढण्यासाठी कोणी जावे, असा प्रश्न निर्माण झाला. कारण, जो जिंकेल त्याला तो इलाका मिळणार होता. वाद निर्माण होऊ न देता भोसल्यांनी ‘तुम्ही व्हा पुढे’ असे म्हणत पेशव्यांना नेतृत्व करण्यास सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव यांना पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बदल श्रीमत राजे रघुजी महाराज भोसले ( प्रथम) स्मरणार्थ राजरत्न पुररकार रा स्व संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत याच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ साहित्यीक डॉ. वि. स. जोग, , वृत्त छायाचित्रकार मुकेश कुकडे, गिरीश उपाध्याय, नरेंद्रनाथ मेनन, अनिल पालकर, हितवी शाह, मृदुल घनोटे आदींना सरसंघचालकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व राजे रघुजी भोसले यांच्या प्रतिमेस सरसंघचालकांनी अभिवादन केले. पुलवामा हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्या सोलापूरकर व चमूने पोवाडा सादर केला. त्यांचा व संचालनकरणारे सारंग ढोक यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राजेे मुधोजी भोसले यांनी केले. किशन शर्मा यांनी आभार मानले.
संपूर्ण पत्रकारितेचे संरक्षण
डॉ. वि.स. जोग म्हणाले, ‘‘राजे रघुजींचा इतिहास कुणीच विसरू शकणार नाही. दै. तरुण भारतचे संस्थापक संपादक ग.त्र्यं. माडखोलकर यांना गांधी हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत स्वतःच्या वाहनावर बसवून प्रतापसिंहराजे भोसले यांनी सुरक्षित राजवाड्यावर आणले आणि संपूर्ण पत्रकारितेचे संरक्षण केले. राजे भोसले व डॉ. हेडगेवार यांची जवळीक होती. आजही या घराण्याची संघाशी जवळीक कायम आहे.’’
मुस्लिम संवाद कौतुकास्पद
अजमेरला दोन-तीन दिवसांपूर्वी रा. स्व. संघाचे पथसंचलन झाले. तेथील दर्ग्याजवळील मुस्लिम दुकानदारांनी संघ स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव केला. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मुस्लिमांसोबत संवाद साधल्याचा हा परिणाम आहे. मी साम्यवादी असूनही याचे कौतुक करतो, असेही जोग यांनी स्पष्ट केले.
देशभक्ती हा समान धागा
आद्य सरसंघचालकडॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांच्या काळापासून भोसले घराणे व संघाचे नाते कायम आहे. समानधर्मी व्यक्तींची मैत्री असते. ही परंपरा सुरू असून, तिचा समान धागा आहे, देशभक्ती, देशहिताची चिंता, असेही सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी स्पष्ट केले.


