विद्यार्थ्यांनी जिंकले गावकऱ्यांचे मन
किन्ही-धानोलीतीत ग्रामशिबीराचा समारोप
नागपूर : कुंभलकर सायंकालीन समाजकार्य महाविद्यालयाच्यावतीने किन्ही धानोली गावात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ग्रामशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांचे मन जिंकले. शिबीराचा समारोप गुरुवारी करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, प्रकल्प अधिकारी तुषार सूर्यवंशी, डॉ. तेजींदर सिंह, प्रा. नीरज नकाते, पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाळे, उपसरपंच संगिता भोपे, प्राचार्य डॉ. अभय शेंडे, रासेयो अधिकारी डॉ. भीमराव मेश्राम, समन्वयक अधिकारी डॉ. विनायक साखरकर, डॉ. लक्ष्मीकांत चोपकर, डॉ. संजय फुलकर, डॉ. सीमा लाडे उपस्थित होते.

गेल्या 11 ते 17 फेब्रुवारीदरम्यान किन्ही धानोली गावात कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या ग्रामशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक विशाल काळे आणि मानवी तस्करी विरोधी पथक प्रमुख रेखा संकपाळ यांच्यासह अन्य मान्यवरांनी हजेरी लावली.

सात दिवस विद्यार्थ्यांनी गावातील समस्या आणि त्यावर उपाययोजनाबाबत कार्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या किन्ही गावातील विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. तर विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. अति. जिल्हाधिकारी गाडीलकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणासह समाजकार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी हा परीपक्व होतो. पोलीस निरीक्षक पर्वते म्हणाले की, यशाला शॉर्टकट नसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वांगिन अभ्यास करूनच पुढे जायला हवे. अन्यथा स्पर्धेच्या युगात टिकाव लागणार नाही. तर पोलीस अधिकारी सीमा सूर्वे आणि रेखा संकपाळ यांनी महिलांचे प्रश्न, पोलिसांची भूमिका आणि कौटुंबिक समूपदेशनासह तरुणींना सक्षम कसे व्हावे, याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरादरम्यान रोज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे संचलन विजया वाघ यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. अभय शेंडे यांनी केले. या शिबीराचे नियोजन डॉ. भीमराव मेश्राम, डॉ. विनायक साखरकर, डॉ. संजय फुलकर, डॉ. सीमा लाडे यांनी केले. या कार्यक्रमात विवेक वानखडे, प्रमोद ठाकरे, अनिल कांबळे, मयुरी उंदिरवाडे, दीक्षा अवघड, प्रणव जुनघरे, माधुरी ठाकरे, दिपाली गोसावी, प्राजक्ता शंभरकर, शुभांगी कुथे, सोनू भोयर, आशिष ताकसांडे, विलास मेश्राम, तस्कीन शेख, प्रियंका मेश्राम, मेघा उके, प्रणाली पावणे, प्रमिला गणवीर, संकल्प, पवन तिवसकर, अनिरुद्ध पाठक, प्रणाली पिंपळकर, सुमित खडसे, चैताली रामटेके, ईशा मेलवानी, मनिषा कांबळे, सरला वाघमारे यांनी सहभाग घेतला.


