नागपुरात गडकरींसोबत संपादकांची बंद द्वार चर्चा, वादग्रस्त संपादकही उपस्थित !
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र यांनी ९ वर्षांचा शासन कार्यकाळ पूर्ण केल्या प्रसंगी नागपुरातील एका क्लबच्या वातानूकूलीत खोलीत विविध दैनिकातील संपादकांशी बंद द्वार चर्चा झाली. या चर्चेमध्ये काही वादग्रस्त संपादकही उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांचा शासनकाळ पूर्ण केला. त्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून नागपूर येथे संपादक व स्थानिक पत्रकारांची पत्रकार परिषद आयोजित केल्याची समाज माध्यमातून माहिती मिळाली. नितीन गंडकरी यांनी सकाळी १० वाजता एका क्लब मध्ये संपादकांशी बंद द्वार चर्चा केली. त्यामध्ये कुठकुठल्या विषयावर चर्चा झाली याची माहिती नाही. मात्र विश्वस्त सुत्राने सांगितल्यानुसार इतर काही निवडक मुद्दावर चर्चा झाली. निवडक कुठले मुद्दे हे वाचकांनी समजून घ्यावे. पण या बंद द्वार चर्चेमध्ये काही वादग्रस्त संपादक उपस्थित असल्याचे विश्वस्त सुत्रांनी सांगितले. या बैठकीची चर्चा मात्र नागपुरच्या सर्वच माध्यमांमध्ये आहे.


