नागपूरात डिजिटल मीडिया उभारणार मोठे कार्यालय !
पत्रकार परिषदेसाठी असणार व्यवस्था
रविभवन येथे मॅरेथॉन बैठकीत झाला निर्णय
नागपूर : येथील डिजिटल मीडिया लवकरच शहरात मोठे प्लॅटफार्म तयार करण्याच्या मार्गावर आहे. शहरात प्राईम लोकेशनवर लिज वरती डिजिटल मीडियाच्या संपादकांसाठी मोठे कार्यालय असणार आहे. पत्रकार परिषद घेण्याची व्यवस्था या कार्यालयात राहणार आहे. मंगळवार ५ सप्टेंबर रोजी रविभवन येथे नागपूर डिजिटल मीडिया संघाच्या वतीने आयोजित बैठकी मध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी नागपूर जिल्हा व शहरातील ४० च्या जवळपास न्यूज पोर्टलचे संपादक बैठकीला उपस्थित होते.
देशातील प्रिन्ट मीडिया, ईलेक्ट्रॉनिक मीडियाने आपली विश्वास पात्रता गमावली आहे. नागरिकांचा विश्वास आता डिजिटल मीडियावर अधिक आहे. काही डिजिटल मीडिया संपादकांचा अपवाद वगळता सत्य जनते समोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न डिजिटल मीडियाचे संपादक करतात, हे तितकेच सत्य आहे. अश्या अनेक विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. टिळक पत्रकार भवन, नागपूर प्रेस क्लबचे व्यवस्थापक मंडळ मोठ्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेला डिजिटल मीडियाला का बोलावित नाही याच्यावरही बैठकीत चिंतन-मंथन करण्यात आले.
नागपूर डिजिटल मीडिया संघ आता आपला वेगळा प्लॅटफार्म तयार करण्याच्या मार्गावर आहे. येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. डिजिटल मीडियाची गाईड लाईल कशी असावी यासंदर्भात निवेदन देणार आहे. नागपूरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात डिजिटल मीडियाच्या संपादकांना सन्मान मिळावा, बैठकीला डिजिटल मीडियाचा प्रतिनिधी असावा यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. डिजिटल मीडियाचे संपादक लवकरच शहराच्या हृदयस्तंभा शेजारी मोठे कार्यालय भाडेतत्वावर घेणार आहे. पत्रकार परिषद घेण्याची व्यवस्था कार्यालयात असणार आहे. त्यामुळे, आता नागपूर शहरात डिजिटल मीडिया सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सज्ज झाली आहे. रविभवन येथे पार पडलेल्या मॅरेथॉन बैठकीला शहरातील ४० च्या जवळपास डिजिटल मीडियाचे संपादक उपस्थित होते. बैठकीला वरिष्ठ पत्रकार भीमराव लोणारे, जितेंद्र धाबर्डे, श्रीकांत कुरुमभटे, महेश शिंपी, सुभाष गोडघाटे यांनी मार्गदर्शन केले. वरिष्ठ पत्रकार विजय खवसे यांनी उपस्थित डिजिटल मीडियांच्या संपादकांचे आभार मानले.


