जखमी बिबट्याने सोडल खानपान , लघवी वाटे होत आहे रक्तस्त्राव !
नागपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सहा ते सात महिन्याच्या मादी बिबट्याने खानपान सोडल आहे. त्याच्या लघवी वाटे रक्तस्त्राव होत आहे. सेमिनरी हिल्स येथील वन्यजीव उपचार केंद्रात बिबट्यावर उपचार सुरु आहे. रस्ता ओलांडताना सोमवार (४ मार्च) च्या रात्री अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली होती. कळमेश्वर-धापेवाडा हायवे मार्गावर हा अपघात झाला होता.
वनविभागाच्या कंत्राटी डॉक्टरांच्या टीमने सांगितले, की बिबट्या उपचाराला प्रतिसाद देत नाही. बिबट्याचा शरीराचा मागचा भाग निकामी झालेला आहे. त्याच्या शरीरातील आतिल अवयव वाहनाच्या धडकेने ‘डॅमेज’ झाले आहे. त्यामूळे लघवीद्वारे बिबट्याचा रक्तस्त्राव होत आहे. वन्यजीवांचे तापमान १०१ ते १०२ असायला हव, पण जखमी बिबट्याचे तापमान ९६ डिगरी फॅरानाइट असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पावलो पावली जखमी बिबट्याच्या हालचालीवर डॉक्टरांची टीम नजर ठेऊन आहे. कळमेश्वर-धापेवाडा हायवे मार्गावर नेहमी वन्यजीवांचे अपघात होतात.
वनविभागाला याबाबत माहिती असून सुद्धा ठोस उपाय योजना करीत नाही. वनाधिकारी एसी मध्ये बसून जंगलाची माहिती घेतात. पण वनपरिक्षेत्रातील वन्यजीवांना कुठला त्रास आहे, याकडे मात्र ते लक्ष देत नाही. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पाण्याच्या शोधात वन्यजीव मानवी वसाहती धाव घेतात. यातच ते जखमी किंवा त्यांचा मृत्यू होतो. वनपरिक्षेत्राच्या भरवश्यावर वनविभाग कोट्यावधीचा निधी कमावतात. मात्र वन्यजीवांच्या सुरक्षे संदर्भात ठोस उपाय योजना करीत नाही. याकडे मंत्री महोद्यांचेही दुर्लक्ष असते, हे विशेष.