सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

लघुवेतन कॉलनी येथे अघोषित कचरा घर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

लघुवेतन कॉलनी येथे अघोषित कचरा घर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

नागपूर : मनपाद्वारे कचरा उचलणारे वाहन घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल करीत असतानाही काही बेजबाबदार नागरिक कचरा घर नसतानाही घरातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात. त्यामूळे परिसराला कचरा घराचे स्वरुप आले असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. लघुवेतन कॉलनी येथील हे अघोषित कचरा घर आहे.

उत्तर नागपूर येथे लघुवेतन कॉलनी वसाहत आहे. याच कॉलनीच्या शेजारी विद्यानगर, मायानगर आहे. गुलादे व टेंभूर्णे यांच्या घराच्या मधातून मायानगर, विद्यानगरकडे जाणारा मार्ग आहे. याच मार्गावर लघुवेतन कॉलनीचे हे अघोषित कचरा घर आहे. चोवीस तास या मार्गाने नागरिकांची येजा असते. तोंडाला कापड बांधूनच नागरिकांना मार्ग भ्रमण करावा लागतो.

मलेरिया, डेंग्यू, श्वसनाचे आजार अघोषित कचरा घरामूळे परिसरात पसरत आहे. अनेकदा यासंदर्भात लघुवेतन कॉलनीचे अध्यक्ष महेंद्र राऊत, सचिव प्रभाकर मात्रे, संचालक भीमराव लोणारे, बबलू कराडे, अभिषेक कोकोडे, मनोज तिवारी आदींनी मनपाला कळविले आहे.

मनपाद्वारे परिसराचा कचरा उचलण्यात येतो, मात्र कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात नाही, हि शोकांतीका आहे. पावसाळ्याच्या दिवसात अधिकच वाईट परिस्थिती असते. अघोषित कचरा घर बंद करण्याची मागणी लघुवेतन कॉलनीचे विजय गजभिये, स्वप्नील भालेराव, नंदकिशोर वाळके, प्रवीण भिवगडे आदींनी केली आहे.

- Advertisment -