सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर मंगळवार (१४ मे) ला सुप्रीम कोर्टात सुनावणी

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर मंगळवार (१४ मे) ला सुप्रीम कोर्टात सुनावणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्हं आणि नाव प्रकरणात मंगळवार (१४ मे) रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रासह देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव प्रकरणावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

याच याचिकेवर मंगळवार (१४ मे) रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात आता केवळ पाचव्या टप्प्यासाठी मतदान राहिले आहे. येत्या २० मे रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. यावेळी एकूण १३ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे आता जोरदार प्रचाराची रणधुमाळी बघायला मिळणार आहे. अशावेळी आता सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीच्या याचिकांवर महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण लिस्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात दुपार १२ नंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत काय युक्तिवाद होतो ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात मोठं बंड पुकारल्यामुळे पक्षात फूट पडली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. तर शरद पवार यांनी सत्तेत न जाण्याचा निर्णय घेतलाय. याउलट शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे वर्षभरापासून दोन्ही पवार काका-पुतण्यामध्ये राजकीय आणि कायदेशीर संघर्ष बघायला मिळत आहे.

- Advertisment -