सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

टायटन कंपनी लि.तर्फे नागपूर मध्ये स्ट्रॅटेजिक मल्टी-ब्रँड स्टोअर 

टायटन कंपनी लि.तर्फे नागपूर मध्ये स्ट्रॅटेजिक मल्टी-ब्रँड स्टोअर 

नागपूर : आघाडीची भारतीय घड्याळ आणि वेअरेबल रिटेलर टायटन कंपनी लिमिटेडने आज ११ जून २०२४ रोजी तीन नवीन दालने सुरू करत नागपूरमध्ये आपल्या रिटेल व्यवसायाचा लक्षणीय विस्तार करत असल्याची घोषणा केली.

हे धोरणात्मक पाऊल प्रिमियम घड्याळे आणि लाइफस्टाइल ऍक्सेसरीजच्या वाढत्या मागणीची पूर्तता करून आणि नागरिकांना प्रसिद्ध ब्रँड्सची विस्तृत निवड सादर करून शहरातील टायटनचे बाजारपेठेतील अग्रणी स्थान मजबूत करते. टाटा सन्स प्रा.लि.चे संचालक श्री.भास्कर भट्ट लि. आणि टायटन कंपनी लि.च्या पश्चिम विभागाचे क्षेत्रीय व्यवसाय प्रमुख श्री. निरज भाकरे यांच्या उपस्थितीत स्टोअर्सचे उद्घाटन करण्यात आले.

हा विस्तार टायटनसाठी एक महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळे यातून महाराष्ट्राच्या बाजारपेठेशी असलेली बांधिलकी दृढ केली आहे. ग्राहकांच्या पसंती आणि बजेटच्या विस्तृत श्रेणीला सेवा पुरवत तीन नवीन स्टोअर्स विविधांगी आणि व्यापक ब्रँड पोर्टफोलिओ सादर करतील.

टायटन वर्ल्ड अँड हेलिओस: या १७०० चौरस फूट असा विशाल विस्तार असलेल्या प्रमुख स्टोअरचा संपूर्ण कायापालट झालेला असून ते विदर्भातील टायटनचे सर्वात मोठे स्टोअर म्हणून उभे राहिले आहे. यामध्ये सर्वसमावेशक टायटन कलेक्शनसह हेलिओस मधील निवडक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहेत. यामध्ये २५०० हून अधिक डिझाइन्स असून विदर्भातील घड्याळांचा हा सर्वात विस्तृत संग्रह आहे.

टायटन वर्ल्ड (स्टँडअलोन): मनीष नगरच्या वाढत्या भागासाठी आपली पोहोच विस्तारत टायटनने शहरात आपले ५ वे खास ब्रँड आउटलेट सादर केले आहे. या ६५० चौरस फुटांच्या स्टोअरमध्ये आकर्षक टायटन घड्याळे आहेत. प्लॉट क्रमांक ६, मनीष नगर टी-पॉइंट जवळ, बेलतारोडी रोड, मनीष नगर, नागपूर येथे हे स्थित आहे.

फास्ट्रॅक (स्टँडअलोन): नागपुरातील फॅशन-सजग व्यक्ती आता शहराच्या पहिल्या खास फास्ट्रॅक स्टोअरमध्ये जाऊन आनंद घेऊ शकतात. या दालनात तरुणाईच्या लाडक्या फास्ट्रॅक घड्याळे आणि ऍक्सेसरीजचा ट्रेंडी संग्रह आहे. हे स्टोअर नागपूर धरमपेठ, WHC रोड, बटुकभाई ज्वेलर्सच्या समोर असे धरमपेठच्या मध्यभागी आहे. ३०० चौरस फुटांचे हे स्टोअर स्टायलिश टाइमपीसेसची वाढती मागणी पूर्ण करते.

“नागपूरमधील हा धोरणात्मक विस्तार भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये टायटनचे स्थान अधिक बळकट करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे,” असे टायटन कंपनी लि.च्या पश्चिम विभागाचे क्षेत्रीय व्यवसाय प्रमुख श्री. निरज भाकरे म्हणाले.

“नागपूर ही प्रीमियम घड्याळांची आणि जीवनशैलीविषयक उत्पादनांसाठी वाढती मागणी असलेली एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे. या नवीन स्टोअर्सच्या माध्यमातून विविध ब्रँड पोर्टफोलिओ आणि उत्कृष्ट रिटेल अनुभव सादर करून आम्ही आमच्या ग्राहकांच्या सतत बदलत्या आणि विकसित होत असलेल्या प्राधान्यांची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.”

भव्य उद्घाटन साजरे करण्यासाठी टायटन वर्ल्ड आणि हेलिओस स्टोअर्स निवडक वस्तूंवर २३ जून २०२४ पर्यंत ४०% पर्यंत सवलत देतील. फास्ट्रॅक स्टोअर या आनंदात सहभागी होत २३ जून २०२४ पर्यंत निवडक उत्पादनांवर ३०% पर्यंत सवलत देणार आहे.

टायटन कंपनी लिमिटेड नवीन स्टोअर्सच्या माध्यमातून प्रीमियम टाइमपीसेस आणि लाइफस्टाइल ऍक्सेसरीजच्या जगाचा अनुभव घेण्यासाठी नागपुरातील घड्याळ आणि फॅशन प्रेमींचे मन:पूर्वक स्वागत करत आहे.

- Advertisment -