सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

गरीब विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरावे ‘विज्ञान केंद्र’

ना. श्री. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रभाषा परिवारचे सुरेश अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, एनआयटी सभापती संजय मीणा, शिक्षणाधिकारी आदींची उपस्थिती होती. राष्ट्रभाषा परिवारच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळ्याचे नियमित आयोजन केले जात आहे. या मेळ्यात बहुतांश प्रमाणात महानगरपालिकेच्या शाळांचे विद्यार्थी सहभागी होऊन प्रयोग सादर करतात.

ना. श्री. गडकरी यांनी या संकल्पनेचे कौतुक करून शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र मूलभूत विज्ञान केंद्र असावे, अशी संकल्पना मांडली. याच संकल्पनेवर आधारित हे केंद्र उभे होणार असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे, असा आग्रह ना. श्री. गडकरी यांनी केला. गरोबा मैदान येथील पूर्वीच्या मनपा शाळेच्या एक एकर जागेवर नागपूर सुधार प्रन्यास हे मूलभूत विज्ञान केंद्र उभारणार आहे.

याठिकाणी भारतासह जगभरातील विज्ञानाच्या संदर्भातील प्रयोगांचे प्रदर्शन असावे, चांद्रयान, मंगलयानची प्रतिकृती असावी, जेणेकरून या विद्यार्थ्यांना चित्ररुपात ज्ञान मिळेल आणि त्यांच्यामध्ये विज्ञानाबद्दल गोडी निर्माण होईल. एका छोट्या हॉलमध्ये बसून विद्यार्थी विज्ञानाचे प्रयोग करू शकतील, अशी सोय देखील करावी, असेही ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. विज्ञान केंद्रासोबत ई-लायब्ररी व मिनी थिएटरचा समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शंभर ते दोनशे आसन क्षमतेच्या मिनी थिएटरमध्ये महापुरुषांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्याची सोय करता येईल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. संपूर्ण इमारत सौर ऊर्जेवर संचालित असावी, एक उपहारगृह असावे, अशाही सूचना त्यांनी केल्या. मूलभूत विज्ञान केंद्रासाठी जागा निश्चित करावी आणि चांगल्या आर्किटेक्चरच्या सल्ल्याने डिझाईन तयार करावे व लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश ना. श्री. गडकरी यांनी दिले. यावेळी शहरातील विविध विकासकामांवरही चर्चा झाली.

- Advertisment -