‘हेल्मेट’ डोक्यावर असेल तरच नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात प्रवेश !
नागपूर : पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर शहर येथे टू-व्हिलरने जात असाल तर डोक्यावर’हेल्मेट’घाला. अन्यथा प्रवेश मिळणार नाही, उलट चालान कारवाई होईल. पोलीस आयुक्तांनी प्रवेशद्वारावर तैनात केलेला शिपाई तुम्हाला आतच सोडणार नाही, हे सत्य आहे.
नागपूर शहरात टू-व्हिलरने प्रवास करताना डोक्यावर हेल्मेट नसेल तर ट्राफिक पोलीस चालान करतो. ते चालानही नविन मोटर कायद्यानुसार हजार रुपये आकारण्यात येते. शहरात ‘हेल्मेट’ सक्ती असायलाच हवी. पण एखाद्या शासकीय कार्यालयात प्रवेश करताना अनेक टू-व्हिलर चालक डोक्यावरचा ‘हेल्मेट’चा भार कमी करुन तो भार टू-व्हिलरच्या डोक्यावर टाकतो, हे सत्य नाकारता येत नाही. पण आता टू-व्हिलरने नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात प्रवेश करीत असाल, तर डोक्यावरच हेल्मेट ठेवा, अन्यथा हजार रुपये दंड ठोठाविण्यात येईल. आठडा लोटायला येत आहे पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी हा फतवा काढला आहे.


