एचडीएफसी बँक परिवर्तनने सुधारले महाराष्ट्रातील 65.28 लाखांहून अधिक लोकांचे जीवनमान
ग्रामीण विकास, शिक्षणाचा प्रसार, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार वृद्धीवर सर्वाधिक प्रभाव
नागपुर -भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम(सीएसआर) असलेल्या ‘परिवर्तन’अंतर्गत महाराष्ट्रातील 65.2. लाखांहून अधिक तर संपूर्ण भारतात 10.113 कोटीहून अधिक लोकांचे जीवनमान सुधारले आहे. महाराष्ट्रातील 36 पैकी 31 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे सुरु आहे.
बँकेने समग्र सामाजिक कार्यासाठी परिवर्तन अंतर्गत सहा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. ते खालीलप्रमाणे :
1. ग्रामीण विकास
2. शिक्षणाचा प्रसार
3. कौशल्य प्रशिक्षण आणि उपजीविका विकास
4. आरोग्य आणि स्वच्छता
5. आर्थिक साक्षरता आणि समावेशन
6. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन
महाराष्ट्रात,6 प्रमुख क्षेत्रांपैकी ग्रामीण विकास, शिक्षणाचा प्रचार, कौशल्य प्रशिक्षण आणि उपजीविका विकास या क्षेत्रांवर सर्वाधिक प्रभाव पडला असून, याचा फायदा अनुक्रमे 49685+ शेतकरी, 1 लाख+ विद्यार्थी, 74470+ महिला उद्योजकांना झाला आहे.
बँकेने औरंगाबाद, बीड, चंद्रपूर, हिंगोली, जालना, मुंबई, नागपूर, नांदेड, उस्मानाबाद, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये विकास कार्यक्रम राबविला आहे. भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, लातूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, सातारा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वांगीण ग्रामीण विकास उपक्रमांच्या माध्यमातून काम केले आहे.
प्रमुख मदत : दुष्काळासाठी ग्रामीण मदत
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात कमी पाऊस आणि कमी होत असलेली भूजल पातळी हे एक मोठे संकट आहे,जे हवामान बदलामुळे आणखी गंभीर झाले आहे. यावर उपाय म्हणून, परिवर्तनने अनेक जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (एनआरएम) कार्यक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये भूजल जपण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कालवे, मातीचे धरणे आणि चेक डॅम यासारखे 1460 हून अधिक माती आणि जलसंधारण प्रकल्प उभारण्यात आले.
परिवर्तनने आपल्या अंमलबजावणी भागीदारांसोबत मिळून माती आणि पाणी संरक्षण, सरकारी योजना आणि सेवा, पाणी व्यवस्थापन पद्धती, आणि पाणी नियोजन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर जागरूकता करणारी सत्रे आयोजित केली. याशिवाय, बँकेने ग्रामस्थांना दूषित पाण्यामुळे होणारे रोग आणि त्यांच्या प्रतिबंधक उपायांबद्दल शिक्षित केले, कारण अनेक गावकरी टाक्यांमधून पुरवठा होणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहत होते.
12 गावांमध्ये समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम
एचडीएफसी बँक परिवर्तन, कोहेझन फाउंडेशन ट्रस्टच्या सहकार्याने तुळजापूर तालुक्यातील 12 गावांमध्ये समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम राबवत आहे, ज्याचा लाभ 4000 कुटुंबांमधील 18000 हून अधिक लोकांना होतो आहे. या उपक्रमात पुढील गोष्टींचा समावेश आहे:
सौर उर्जा आधारित रस्त्यावरील दिव्यांची स्थापना
जैविक पद्धतीने विविध पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन
जलसंधारण आणि सिंचन प्रणालीचे पुनरुज्जीवन
ओस्मानाबादी बकऱ्या आणि परसबागेतील कुक्कुटपालन प्रकल्पांची उभारणी
हा कार्यक्रमाअंतर्गत 14 चेक डॅम्सचे बांधकाम,प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देणे आणि तुळजाई महिला बकरी आणि कोंबडी उत्पादक सहकारी सोसायटीला मदत देणे याचा देखील समावेश आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, महिलांचे सक्षमीकरण होईल आणि गावाचा सर्वांगीण विकास होईल.
“एचडीएफसी बँक देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि आम्ही सेवा देणाऱ्या समुदायांचे जीवन सकारात्मकरित्या बदलविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. एचडीएफसी बँक परिवर्तनद्वारे, आम्ही महत्त्वाच्या समस्या सोडवण्यावर आणि शाश्वत विकासासाठी उपक्रमांना पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित करतो,” असे एचडीएफसी बँकच्या सीएसआर विभागाच्या प्रमुख नुसरत पठाण यांनी सांगितले.
“आम्ही राज्यभरातील सर्वसमावेशक आणि सहज उपलब्धता असलेल्या बँकिंग सेवांची एक व्यापक श्रेणी प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. एक सामाजिकदृष्ट्या जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून, एचडीएफसी बँक व्यक्तींच्या आणि कुटुंबांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी आपली भूमिका बजावण्यावर लक्ष केंद्रित करते. आम्ही समुदायांना समृद्ध होण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यास कटिबद्ध आहोत,” असे एचडीएफसी बँकचे, महाराष्ट्र प्रदेशाचे बँकिंग प्रमुख तरुण चौधरी यांनी सांगितले.
एचडीएफसी बँक मार्च 2023 आर्थिक वर्षासाठी सामाजिक उत्तरदायित्वा अंतर्गत खर्च करणाऱ्या देशातील प्रमुख बँकांपैकी एक होती. 31 मार्च 2024 पर्यंत, बँकेने देशभरातील सामाजिक उपक्रमांवर 945.31 कोटी खर्च केले. एचडीएफसी बँक परिवर्तनाने सप्टेंबर 2024 पर्यंत देशभरातील 10.113 कोटींहून अधिक लोकांचे जीवन सकारात्मकरीत्या प्रभावित केले आहे.